*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
महाराष्ट दिनी माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांचे पंचायत समिती तुळजापूर येथे लाक्षणीक उपोषण : ०१/०५/२०२६, सकाळी १०:०० वाजता करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी कंपन्याद्वारे होत असलेल्या ग्रामपंचायत कर चूकवेगिरीबाबत वारंवार आवाज उठवत आहेत. प्रशासनाची कर वसुली करणे ही जबाबदारी असतानाही प्रशासकीय अधिकारी काम करण्यास वेळकाढूपणा का करत आहेत असा सवाल श्री सावंत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना केला आहे. एकाच विषयासाठी मागील तीन वर्षात तीन गटविकास अधिकारी बदललेले असून कामाची काही प्रगती होत नाही
त्यामुळे अधिकारीवर्ग कर चुकवेगिरीस खतपाणी घालत आहेत का किंवा इतर शंका निर्माण होत आहेत त्याची तालुक्यात दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे श्री सावंत यांनी पंचायत समिती तुळजापूर येथे महाराष्ट्र दिनी म्हणजे दिनांक ०१ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता लाक्षणीक उपोषण करणार असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, तहसीलदार कार्यालय तुळजापूर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर, पोलीस उपअधीक्षक यांना इशारा दिला आहे. हे त्यांचे मागील तिन वर्षांमध्ये कर वसुली संदर्भातचे आत्मदहन आंदोलनासह आठवे आंदोलन आहे त्यामुळे या आंदोलनाचे तामलवाडी पंचकृषीचे लक्ष वेधून घेतले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा