*निमगाव मगराचे --प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी अंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत निमगाव ता माळशिरस येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली माळशिरस तालुक्यातुन नेवरे ते गारवाङ हा शक्तीपीठ महामार्ग संपुर्ण बागायत पट्यातुन जात असुन जे बधीत शेतकरी आहेत त्यांचे प्रपंच उध्वस्त होणार आहेत
आशा जुलमी शक्तीपीठ ला ताकदीनीशी विरोध तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करण्याचे सर्वनुमते ठरले शक्तीपीठ हा ज्यांच्या शेतातून जात आहे त्यांना अनेक दलांनी भुरळ पाङुन टक्केवारीचे आमीष दाखवून उभी पिके जमीनदोस्त करून करार पध्दतीने आंबा लागवड करण्यास भाग पाडले तर ही योजना फसवी असुन शेतकऱ्यांना या पासुन फायदा मिळण्या ऐवजी
नुकसानच होणार आहे तरी बाधीत शेतकऱ्यांनी आशा फसव्या योजांना बळी पङु नये असे आवाहन सभापती दत्ता मगर यांनी केले
या वेळी के के पाटील हनुमंत पवार संभाजीराव मगर यांनी शेतकऱ्यांना एकजुटी अंदोलन करण्याचे आवाहन केले
अॅङ लक्ष्मण मगर महादेव मगर उत्तम पाटील भारत मगर उत्तम शेळके दत्तञाय मगर विष्णुपंत मगर महावीर मगर सौरभ मगर यासह गारवाङ चांदापुरी वेळापुर येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
आभार रामभाऊ मगर यांनी मानले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा