Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ मार्च, २०२६

*​डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा महायज्ञ; ११७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.*

 *अकलूज ---प्रतिनिधी* 

    *केदार --लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



लोकप्रिय नेतृत्व डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला तरुणाईचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.शिबिराचे' उदघाटन जनसेवा संघटनेचे नेते माणिकराव मिसाळ,अण्णासाहेब शिंदे, राजाभाऊ गुळवे,रणजितसिंह देशमुख,सुधीर रास्ते यांचे हस्ते करण्यात आले.या शिबिरात एकूण ११७ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च टाळून, समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला होता.


        सकाळी १० वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रक्तदान केंद्रावर गर्दी केली होती.

​केवळ युवकच नव्हे तर महिलांनीही या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदवला.अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून एकूण ११७ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले, ज्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी केला जाणार आहे.​यावेळी सर्व रक्तदात्यांना आयोजक तांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.



           ​यावेळी बोलताना आयोजक राजु गुळवे यांनी सांगितले की,"डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्व नेहमीच जनसेवेला प्राधान्य देतात,त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी कामी येईल हाच आमचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले."अकलुज व ​परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आणि डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसेवा संघटनेचे राजु गुळवे, सुधीर रास्ते,प्रताप कोकीळ,सतिश साठे,बबनराव शेंडगे,रणजितसिंह देशमुख,प्रताप झंजे,चंद्रकांत गायकवाड,गणेशकाका महाडीक,ज्योतीताई कुंभार, नवनाथ भाऊ साठे,संजय गाडे,अनिल सोनार,रघुनाथ साठे,हिरा खंडागळे,शिवाजी जाधव,राजेश पवार,अभिजीत माने,मुबारक कोरबु,अजित पवार, निखिल फुले,बशीर शेख,अण्णा सुरवसे,कन्हैया चव्हाण,अनिल ओरसे,पिंटु वैद्य ,इस्लाम पटेल, सोमनाथ कोरे,बाबु चव्हाण,पिंटु कदम,फिरोज देशमुख,राहुल जाधव,रोहिदास हनवते,अरुण शहाणे,शेखर शेंडे,आप्पा जाधव, यांनी विशेष परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा