Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ मार्च, २०२६

*करमाळा येथे रमजान ईद निमित्त गोरगरीब 400 गरजू मुस्लिम बांधवांना करण्यात आले शीरखुर्मा साहित्याचे वाटप* *हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा येथील माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या संकल्पनेतून हाजी हाशमुद्दीन चारिटेबल ट्रस्ट च्या वतीने करमाळा शहरातील मौलाली नगर येथील गोरगरीब गरजू बांधवांना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले सदरचा सामाजिक आगळावेगळा उपक्रम करमाळा सोलापूर महामार्गावरील कमलादेवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी फार्म हाऊसवर पार पडला यावेळी मुस्लिम समाजातील गोरगरीब व गरजू 300 ते 400 लाभार्थींना सदर शीरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले



गोरगरीब गरजू मुस्लिम समाजातील बांधवांना रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा व त्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा या दृष्टिकोनातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी तसेच करमाळा मुस्लिम जमातचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी या दोघा बंधूंच्या संकल्पनेतून केली पाच ते दहा वर्षापासून सदरचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविला जातो              

                              शीरखुर्मा साहित्याचे वाटप अर्थात किटसचे वाटप केले जाते हाजी अशमुद्दिन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच करमाळा तालुका मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी सदरचा सामाजिक तसेच आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असतो यावर्षी देखील सदरचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे युवा नेते  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट चे अध्यक्ष उद्योगपती अमीर शेठ तांबोळी यांच्या सहित माजी नगरसेवक फारूक जमादार, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष पैलवान सोहेल पठाण, इदाज वस्ताद,अजहर शेख, मुस्ताक शेख, अमीन बेग, अरमान शेख, अफरोज पठाण, हानस बागवान, मुख्तार पठाण सरफरोज आतार शाहरुख पठाण नईम पठाण फरहान शेख आदी बहुसंख्य मुस्लिम बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होती सदरचा उपक्रम हा कमलादेवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी यांच्या फार्म हाऊस वर आयोजित करण्यात आला होता





                   :---------- चौकट :--------+-

समाजसेवेचा वसा आमच्या रक्तातच आहे,,,,,,,, हाजी अल्ताफ शेठ तांबोळी 

करमाळा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो असलो तरी आजही मोठ्या ताट मानेने आहोत पराभव झाले असले तरी समाजसेवेचा व्रत आम्ही कधीही सोडणार नाही मुळात आमच्या कुटुंबाच्या रक्तातच समाजसेवेचा गुण आहे असे भावनिक उद्गार हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांनी बोलताना व्यक्त केले इथून पुढे देखील आमची पिढी सदर समाजसेवेचा व्रत चालूच ठेवणार असल्याचे श्री तांबोळी यांनी बोलताना सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा