Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ मार्च, २०२६

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



नवी दिल्ली दि. 24 -  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलग तिस-यांदा आपली राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानले. यावेळी. रामदास आठवले यांनी निळी शाल आणि पुष्पगुच्छ देवुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.

 आपल्याला सलग तिस-यांदा राज्यसभेवर संधी देवुन  केंद्रीयमंत्रिमंडळात सामाजिक न्यायराज्यमंत्री पदाची  संधी कायम ठेवल्याबद्दल देशभरातील आंबेडकरी जनतेत, बहुजन समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. राज्यसभेवर तिस-यांदा आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी अनेक विषयांवर ना.रामदास आठवले चर्चा केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी .रामदास आठवले यांना आता आपण राज्यसभेत 6 वर्ष रहा आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.  

देशात जणगणना सुरु आहे त्यात  धर्मांतरीत बौध्दांच्या जनगणनेविषयी   रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दिवंगत प्रधानमंत्री व्हि पी सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बौध्दांच्या धर्म या रकान्यात बौद्ध आणि जात या रकान्यामध्ये पुर्वाश्रमीच्या जातीच्या अनुक्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. पुर्वाश्रमीच्या महार जातीने महाराष्ट्रात बौध्द धम्मात धर्मांतर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांच्या जनगणनेचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ जातीचा उल्लेख न करता धर्माच्या रकान्यात बौध्द आणि जातीच्या रकान्यात पुर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक 59 हा क्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अनुसुचित जातीच्या यादीत महाराष्ट्रातील  महार ही जात 59 क्रमांकावर आहे. जातीचे नाव न लिहीता जातीचा अनुक्रमांक जातीच्या रकान्यात लिहीला पाहिजे अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली अशी माहिती . रामदास आठवले यांनी दिली.

  विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव आहे. पूर्वी या स्कॉलरशिपमध्ये केवळ भारत सरकारची 10 टक्के रक्कम आणि राज्य सरकारची 90 टक्के रक्कम दिली जात होती. 10 टक्के केंद्र सरकारचा निधी असताना या  स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव दिले होते. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करुन भारत सरकारच्या वतींने देण्यात येणारी स्कॉलरशिप मधील 10 टक्के रक्कम वाढवून  60 टक्के करण्यातआली . त्या स्कॉलरशिप मध्ये आता भारत सरकारचा वाटा 60 टक्के आणि राज्य सरकारचा वाटा 40 टक्के  या अशा पध्दतीने भारत सरकार च्या स्कॉलरशिपची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मागील 15 वर्षापासुन या  स्कॉलरशिपच्या रक्कम मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तेव्हा अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या स्कॉलरशिपमध्ये महागाईच्या निर्देशाप्रमाणे वाढ झाली पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर आपण विचार करु असे आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले.  

प्रधानमंत्र्यांनी सदाबहार असा माझा संसदेत गौरवाने उल्लेख केला. तुम्ही मला म्हणत आहात सदाबहार, कारण मी करतो कॉग्रेसवर प्रहार अशी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांना आपली शिघ्र कविता यावेळी ऐकवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा