*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने डॉ. रेवती राणे यांचे “महिलांचे आरोग्य” विषयक मार्गदर्शनाचे आयोजन करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अकलूज येथील राणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर तसेच स्त्रीरोगतज्ञ व वंध्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ.रेवती राणे तसेच माळशिरस पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ.निशा गिरमे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे मॅडम यांनी केले आणि जागतिक महिला दिनाचा इतिहास संक्षिप्तपणे सांगितला., तसेच या कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित घाडगे यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन केली. महिलांनी स्वावलंबी बनून शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करावी ही अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु.नेहा गायकवाड व कु.संस्कृती गांधी यांनी तर आभार प्रदर्शन कु.किरण पवार यांनी केले.हा कार्यक्रमाचे तृतीय वर्षाच्या “रत्नाई ग्रूप” यांनी आखीव रेखीव नियोजन केले. महिला दिनाच्या या कार्यक्रमाची आखणी महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील व सर्व सदस्या यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा