*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड लिखित 24 व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकलूज येथे दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी भाजपा शहर अकलूज मंडल चे अध्यक्ष मा श्री सुजयसिंह माने पाटील,सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस मा . श्री सचिन शिंदे अकलूज शहराध्यक्ष मा श्री महादेव कावळे तालुका समन्वयक निलेश ननवरे भाजप शहर सरचिटणीस अमोल माने , मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांच्या शुभहस्ते सदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला .
साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड बोलताना म्हणाले "जनता दरबारातून तळागाळातील जनतेच्या समस्या,अडचणी समजून घेऊन न्याय देणारे, शेतकऱ्यांच्या, जनतेच्या पाणी प्रश्नासाठी शासन दरबारी आवाज उठवून पाणी प्रश्न सोडवणारे, तळागाळातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी चंदनासारखे झिजणारे आरोग्यदूत माळशिरस तालुक्यातील शेकडो लाडक्या बहिणींना विमान प्रवास घडवून आणणारे,मनुष्य सेवेला ईश्वर सेवा मानणारे कर्मयोगी माजी आमदार माननीय श्री राम भाऊ सातपुते यांना ही साहित्यकृती अर्पण केली आहे.
यावेळी अकलूज शहरातील शेकडो नागरिकांची सदर कार्यक्रमास उपस्थित होती.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा