Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ मार्च, २०२६

*करमाळा शहर विकास आघाडी च्या नगरसेवकांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट; शहर विकासासाठी निधीची केली मागणी..*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



करमाळा शहर विकास आघाडीचे उमेदवार व नगरसेवकांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची मागणी केली.

सावंत गटाचे गटनेते मा. श्री. सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली 

मा. श्री. संजय सावंत, हुमरान मुलाणी, दादा इंदलकर, सुनील लुणिया, रवि जाधव, संदीप कांबळे, अमोल परदेशी हे नगरसेवक तसेच सिद्धेश लावंड (स्वीकृत नगरसेवक) सहभागी झाले होते.

या भेटीत शहरातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, हद्दवाढीनंतर आवश्यक असलेली मूलभूत सुविधा, तसेच नव्या प्रभागांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी करण्यात आली.

करमाळा शहराचा नियोजनबद्ध व वेगवान विकास व्हावा, यासाठी शासन स्तरावरून तातडीने सहकार्य मिळावे, अशी भूमिका सावंत गटाने स्पष्ट केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

करमाळा शहराच्या विकासासाठी  सावंत गट प्रयत्नशील असल्याचे या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा