*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
स्माईल ९०.८ एफएम अकलूज येथील भव्य प्रांगणात शाहीर दादा कोंडके यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त दादा कोंडके फॅन क्लब, अकलूज आयोजित व स्माईल ९०.८ एफएम, भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज, स्नेही मित्र मंडळ, मॉर्निंग ग्रुप, RVIP टूर्स अँड ट्रॅव्हल्स, गिरीजा ऑटोमोबाईल्स, प्रोफेशनल कूरिअर आणि मलबार हिल प्रस्तुत "झाल्या तिन्ही सांजा" हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुहास उरवणे सर यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले की, "ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेल्या व चित्रपटातून अर्ध्या चड्डी मध्ये भूमिका साकारत शाहीर दादा कोंडके या महान विभूतीने आपल्या कष्ट, जिद्द आणि अद्वितीय विनोदी शैलीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केवळ मनोरंजनच केले नाही, तर त्यामध्ये सामाजिक संदेशही प्रभावीपणे मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या साध्या, सुटसुटीत आणि ग्रामीण बोलीभाषेतील संवादांमुळे सामान्य माणसालाही त्या कलाकृतींशी सहज नाळ जोडता आली. त्यामुळे मराठी भाषा अधिक व्यापक पातळीवर पोहोचली.
"महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने अमिट ठसा उमटवणारे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यात महत्त्वाचे स्थान असणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि शाहीर दादा कोंडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "झाल्या तिन्ही सांजा" विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात दादांच्या प्रतिमा पुजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी दादा कोंडके यांचे वर चित्रित झालेले "हे अंजनीच्या सुता" डॉ.मंगेश शिंदे यांनी उत्तमरीत्या सादर केले, कार्यक्रमादरम्यान विधीतज्ञ भारत गोरवे यांनी "जीवा शिवाची बैल जोड", आशा हेळकर-राजगुरू यांनी तुम ही मेरे मंदिर तुम ही मेरी पूजा", समाधान देशमुख यांनी "चल रं वाघ्या", सौ. सोनाली पाटील यांनी "झाल्या तिन्ही सांजा व बुगडी माझी सांडली गं" ही सुश्राव्य गीते सादर केली. विशेष आकर्षण ठरले ते बाळासाहेब माने यांच्या मेंडोलीन वादनाचे. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी प्रसिद्ध कवी जयंत बोबडे, साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड, प्रकाश चोरमागे, सुवर्णा घोरपडे-गोरवे, वीरेंद्र पतकी, धनश्री उरणे-म्हेत्रस, अनिरुद्र शिंदे, समाधान देशमुख, अरुंधती हजारे, रूपाली पाटील या कवींनी काव्य संमेलनातून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि विनोद यांच्या संगमातून दादांच्या कार्याला अभिवादन केले.
दादांच्या लोकप्रिय लावण्या आणि चित्रपटातील गीते सादर करताना कलाकारांनी त्यांच्या कलाकृतींची जिवंत अनुभूती प्रेक्षकांना दिली. “तुमचं आमचं जमलं, आली अंगावर, सोंगाड्या, एकटा जीव, पांडू हवालदार आदी गाजलेल्या चित्रपटातील गीतांनी बहार आणली.
कार्यक्रमादरम्यान दीपक एकतपुरे, स्माईल ९०.८ एफएम चे संस्थापक शंकर बागडे, गजानन जवंजाळ, अशोक एकतपुरे, सावळे सर या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दादांचा साधेपणा, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि कामावरील निष्ठा, विनोदी शैलीतून जपलेले सामाजिक भान, हिंदू मुस्लिम एकता आदींचा विशेष उल्लेख करत दादा कोंडके यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला.
प्रारंभी दादा कोंडके क्लबचे संस्थापक व दादांचे फॅन कांतीलाल एकतपुरे आपल्या प्रास्ताविकातून विशद करताना सांगितले की, “दादा केवळ कलाकार नव्हते, तर ते एक विचार होते,” दादा कोंडके फॅन क्लब व तसेच सह आयोजकाचे सहकार्यातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढीसमोर दादांचे कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न व विशेषतः तरुणांमध्ये दादांच्या कलाकृतींबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी, मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव व्हावी
हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या शैलीत व सुंदर शब्दालंकारांनी सुहास उरवणे यांनी पार पडले.
कार्यक्रमाची सांगता "मराठा तितुका मेळवावा" या चित्रपटातील "अखेरचा तुला हा दंडवत" हे भैवरीपर गीत डॉ. मंगेश शिंदे यांनी उत्कृष्टरित्या सादर केले या त्यांच्या सादरीकरणाने व हावभावांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत अशा कार्यक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार आयोजकांकडून चालू ठेवावा असे उपस्थितांकडून सांगण्यात आले.
याप्रसंगी अनेक स्रोते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा