Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ मार्च, २०२६

*आदित्य इंगळे यांची कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील लॉ कॉलेज च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध पदी निवड*.

 *मुख्य संपादक* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:-9730867448*




पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील लॉ कॉलेज, चा विद्यार्थी आदित्य गणेश इंगळे यांची यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) महाविद्यालयीन निवडणूक 2026-27 मध्ये उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्य इंगळे यांनी आपल्या नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि विद्यार्थी हितासाठी केलेल्या कामामुळे ही निवड मिळवली आहे. त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या तत्त्वांवर आधारित कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी या निवडीकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी आदित्य इंगळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा