*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
फुकेत (थायलंड) येथे आयोजित विशेष पुरस्कार समारंभात महाराष्ट्राचे आरोग्यदूत मंगेश नरसिंह चिवटे यांना “हेल्थ वॉरियर अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व समाजसेविका . अमृता फडणवीस आणि नामांकित अभिनेते-दिग्दर्शक नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या हस्ते प्रदान झाला.
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी राज्यातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि उपचारापासून वंचित रुग्णांपर्यंत शासनाच्या विविध आरोग्यसेवा योजना पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. रुग्ण सहाय्य, शस्त्रक्रिया मदत, मार्गदर्शन तसेच विविध शासकीय वैद्यकीय उपक्रमांना जोडणारे त्यांचे कार्य राज्यात सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे.
या सत्कार समारंभात बोलताना अमृता फडवणीस म्हणाल्या की
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून त्याच भावनेने राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडवणीस काम करत असून
त्यांना अभिप्रेत असलेले कामच मंगेश चिवटे करत आहेत
त्यांच्या या लोकाभिमुख आणि समर्पित सेवाभावी कार्याची दखल घेत फुकेत येथे हा आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला. असून
साधेपणा, शांतपणे काम करण्याची वृत्ती आणि "सेवा हीच आपली जबाबदारी" या तत्त्वावर काम करणाऱ्या चिवटे यांच्या कार्याचा परदेशातही होत असल्यामुळे सर्व मराठी माणसातून चिवटे यांचे
स्तरातून अभिनंदन होत आहे.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना मंगेश चिवटे म्हणाले की,
"हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू रुग्णासाठी आहे.
त्यातच हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते मला मिळाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
समाजसेवा हीच माझी खरी प्रेरणा आहे, आणि पुढील काळातही अधिक व्यापक पद्धतीने आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माझा प्रयत्न राहील.”
असे मत व्यक्त केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा