उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
.. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी,लातूर आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी इंद्रजीत पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या बहुचर्चित ' चिबाड ' या कवितासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हाेती.प्रस्तुत संमेलनाचे उदघाटन सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे यांच्या हस्ते झाले तर पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष मा.प्राचार्य.डाॅ.माधव गादेकर,राजश्री शाहू महाविद्यालय,लातूरचे प्राचार्य डाॅ.महादेव गव्हाणे,मा.अॅड.डाॅ.श्रीधर गायकवाड,संस्थेचे सचिव मा.श्री.प्रकाश घादगिने व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कवी इंद्रजीत पाटील यांना लातूर याठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम दाेरवे तर आभार प्रदर्शन अॅड.अंगद गायकवाड यांनी केले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या ' चिबाड ' या कवितासंग्रहास अल्पावधीतच यावर्षीचा मिळालेला हा आठवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.त्यांच्या या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून श्री. चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,राहुल भड,अमाेल देशमुख व जीवराज गरड यांनी विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा