Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

*जीतो पुणेचे कार्य आदर्श आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे : आनंद देशपांडे. जीतो पुणे च्या २० व्या स्थापना दिनानिमित्त मान्यवरांचा सन्मान*

 *पुणे, डॉ. संदेश शहा*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*



कोणत्याही उद्योगात खरी स्पर्धा ही तीन कंपन्यांमध्ये असून त्या मिळून सुमारे ७०% बाजारपेठ काबीज करतात. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याचे ध्येय फक्त तो चालवणे नसून, प्रथम क्रमांकावर पोहोचणे असणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर जीतो पुणेचे कार्य आदर्श तसेच समाजात सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करणारे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा पर्सिस्टंट सिस्टीम्सचे आनंद देशपांडे यांनी केले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ( जीतो ) पुणे चॅप्टरतर्फे २० व्या स्थापना दिना निमित्त “उत्कृष्टता सन्मान सोहळा”. कार्यक्रमाचे भव्य आयोजन १६ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा उद्योजक  उपस्थित होते. हा कार्यक्रम जीतो पुणे ॲडव्हायजरी समितीच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खबिया, खजिनदार दिलीप जैन, सहसचिव ॲड विशाल शिंगवी, सहखजिनदार रूपेश कोठारी, फाउंडेशनचे कन्वीअर विशालजी चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला.

याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार  राजकुमार चोरडिया यांना, सामाजिक सेवेतील योगदानासाठी  अभय छाजेड, इंडस्ट्रियलिस्ट श्रेणीत डॉ. राजेंद्र मुथा, यंग एंटरप्रेन्योर म्हणून  जयेश संचेती तसेच महिला उपलब्धी श्रेणीत सौ. दिना प्रकाश धारीवाल, सौ. सुनंदा मेहता आणि सौ. श्रीबाला चोरडिया यांना गौरविण्यात आले.

यावेळी आनंद देशपांडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात उद्योजकता, स्पर्धा आणि नेतृत्व यांचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमासाठी जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे ॲडव्हायजरी  सदस्य देवीचंद जैन, विजयकांत कोठारी, ॲड एस. के. जैन, अचल जैन, राजेश सांखला, प्रकाश धारीवाल, रविंद्र सांखला, नरेंद्र छाजेड, अजय मेहता आणि चेतन भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार सत्कारमूर्ती राजकुमार चोरडिया म्हणाले, आज या मंचावर उभा राहून मागे वळून पाहताना संघर्षासोबतच समाजाचे प्रेम आणि सन्मानही दिसतो. जीतो परिवार माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. हा पुरस्कार माझा नसून माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचा आहे.

महिला उपलब्धी पुरस्कार सन्मानमूर्ती सौ. दिना प्रकाश धारीवाल म्हणाल्या,

“विमेन अचीव्हर म्हणून मिळालेला हा सन्मान केवळ माझा नसून समाजात निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा आहे. पी. आर. धारीवाल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नेहमीच गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करतो.”

जीतो चे राष्ट्रीय अध्यक्ष,

 विजय भंडारी म्हणाले,

“जीतो फाउंडेशनची २० वर्षे म्हणजे फक्त आकडा नाही, तर सर्वांनी जपलेले एक स्वप्न आहे. छोट्या रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज वटवृक्षासारखा विस्तारला आहे. हजारो कुटुंबांना शिक्षण व सेवेचा लाभ मिळत असून आहे हीच आमची खरी संपत्ती आहे. जीतो पुणे चे कार्य कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर, पुरस्कार विजेते व उपस्थितांचे आभार मानून भविष्यात देखील असे प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा