*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
गेल्या दिड वर्षात ग्रामविकासावर भर देत सत्तर कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असुन यातील सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या कामाना प्रशासकीय मंजूरी मिळून सदर कामे मार्गी लागली आहे. अनेक मंजूर कामे पुर्ण झाली असून काही प्रगतीपथावर असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तरपणे माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील इतर आमदारांच्या बरोबरीत करमाळा मतदार संघातही ग्रामविकासाची कामे चालू आहेत. आमदार स्थानिक विकास निधीतून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करमाळा मतदार संघातील सत्तर कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली. वाडी वस्ती वरील रस्ते, सभामंडप, तिर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, शाळा खोली व अंगणवाडी खोली बांधकाम व दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज ट्रान्सफॉर्मर, गाव अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाणी पुरवठा सुविधा, सार्वजनिक वाचनालय बांधकाम, समाजमंदीर, गाव अंतर्गत भुयारी गटार, व्यायामशाळा, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम, गावठाण डिपी, गावातील स्ट्रिट लाईट, वाडी वस्तीवरील हायमास्ट दिवे, पिण्याच्या पाण्याची टाकी, शाळेसाठी संगणक संच व प्रिंटर अशा प्रकारची लोकांना आवश्यक व मागणी नुसार कामांच्या पूर्ततेसाठी निधी मिळवून दिला आहे. पंधरा कोटी मंजुर असून उर्वरित पंचावन्न कोटी रुपयांच्या कामांना इस्टीमेट प्राप्त होईल तशी प्रशासकीय मंजुरी देणे सुरू आहे. या दिड वर्षाच्या कालावधीत दहिगाव उपसा सिंचन योजना चार आवर्तने व कुकडीची चार आवर्तने, रावगाव येथील ३३/११ केव्हीए क्षमतेच्या सबस्टेशनचे काम पूर्ण करुन वीजपुरवठा सुरु, शेटफळ, वांगी १ सह मांगी येथे पाच एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवले, मांगी येथे पाच एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवुन सुमारे सतरा किलोमीटर फिडर लाईनचे काम पुर्ण केल्याने मांगीसह सात गावांतील वीजटंचाई दुर करण्यासाठी उपाययोजना केली, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय निवासी इमारत बांधकाम वाढीव दोन कोटी रुपये निधीची तरतूद, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बंधारे व ओढा खोलीकरण कामे, अतिवृष्टीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाईपोटी सुमारे दोनशे कोटी रुपये निधी मिळवून दिला आहे. दिड वर्षात सक्रिय राहुन काम केल्याने जनतेने माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचे काम करत आदिनाथ सहकारी साखर कारखाना सत्ता व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवून दिले आणि विकासकामांची पोचपावती मतपेटीतून दिली आहे. तसेच आपण आमसभेचे आयोजन करुन प्रशासनाकडे प्रलंबित असलेली नागरिकांची वैयक्तिक कामे मार्गी लावली. महावितरण व इतर महत्त्वाच्या विभागांच्या आढावा बैठका घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन गतिमान केले. तसेच विधानसभा सभागृहात करमाळा मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सतरावेळा आवाज उठवला व शेकडो प्रश्न लिखीत स्वरूपात सुध्दा मांडले. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस वेबकॉस कडून हिरवा कंदील मिळवून घेत सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा केला. डिकसळ पुलाच्या बांधकासंबंधी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशी मागणी करुन मुळ आराखड्यात बदल करत मागील चार वर्षांपासून रखडलेल्या कामास गती दिली. उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर गाळपेर जमीनीवर पिके घेण्यास निर्बंध घालण्यात आले तेंव्हा आपण यावर स्थगिती आणुन धरणग्रस्तांच्या बाजूने उभा राहण्याचे काम केले.आगामीकाळातही मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांना निधी मिळावा यासाठी आपण पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा