Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ मे, २०२६

दत्तकला शिक्षण संस्थेचा Unacademy यांचेसोबत शैक्षणिक सामंजस्य करार*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


ग्रामीण विद्यार्थ्यांना IIT, JEE, NEET, MHT CET या स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन आता स्थानिक पातळीवर

: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांप्रमाणेच उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी उपलब्ध व्हावी, या दूरदृष्टीतून दत्तकला शिक्षण संस्था आणि Unacademy यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. ११ मे २०२६ पासून हा करार अधिकृतपणे लागू झाला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी School Integration Program (SIP) तसेच विविध इंटिग्रेटेड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई, कोटा किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. आर्थिक अडचणी, निवास व्यवस्था, प्रवास खर्च आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी मागे पडतात. हीच बाब लक्षात घेऊन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या सामंजस्य करारामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणासोबतच IIT, JEE, NEET, мнт CET, Olympiad, Foundation Course तसेच विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी करता येणार आहे. विद्याथ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती, विश्लेषण क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या कराराअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी School Integration Program (SIP) राबविण्यात येणार असून शालेय वेळेतच विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, Mental Ability Logical Reasoning आणि Olympiad आधारित अभ्यासाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पायाभूत संकल्पना भक्कम होऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची तयारी लहान वयातच सुरू होणार आहे.

तसेच इयत्ता ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र Integrated Program उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये बोर्ड अभ्यासक्रमासोबतच IIT, JEE, NEET आणि MHT CET परीक्षांसाठी आवश्यक असलेले Physics, Chemistry, Mathematic, आणि Biology विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना वेळोवेळी टेस्ट सिरीज, ऑनलाइन व ऑफलाइन मूल्यांकन, शंका निरसन सत्रे, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Unacademy यांच्या माध्यमातून अनुभवी व तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले प्रशिक्षक विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन पद्धतीद्वारे मार्गदर्शन करतील. याशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य, डिजिटल नोट्स, टेस्ट पेपर्स, प्रश्नसंच, ऑनलाइन प्रॅक्टिस प्लॅटफॉर्म आणि वैयक्तिक मॅटरिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

दत्तकला शिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम, डिजिटल बोर्ड, इंटरनेट सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी, वेळापत्रक नियोजन, पालक समन्वय आणि शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी संस्था प्रभावीपणे पार पाडणार आहे.

या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता शहरांप्रमाणे दर्जेदार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण त्यांच्या परिसरातच मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठी संधी ठरणार आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनविणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांचेकडून सांगण्यात आले.

दत्तकला शिक्षण संस्था आणि Unacademy यांनी संयुक्तपणे हा उपक्रम दीर्घकालीन व परिणामकारक पद्धतीने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी करिअर काउंसिलिंग, पालक मार्गदर्शन कार्यशाळा, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा सेमिनार आणि शिष्यवृत्ती योजना राबविण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे.

      ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आधुनिक स्पर्धात्मक शिक्षणाची नवी दिशा देणारा हा करार भविष्यात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सदर सामंजस्य करारावेळी Unacademy यांचेकडून श्री. अक्षय बोरकर व श्री. चंद्रकांत सोमवंशी उपस्थित होते तसेच दत्तकला शिक्षण संस्थेकडून संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, प्राचार्या श्रीमती सिंधु यादव व श्रीमती वृषाली बागुल उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा