Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मे, २०२६

ऊस आंदोलनाचे सरसेनापती--- रघुनाथ दादा पाटील*

 *अॅड. माणिक शिंदे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना*



माणसाच्या जीवनात सर्वाधिक महत्व जर कशास असेल, तर ते धन, दौलत, विद्या रुप, सौदर्यावर नाही तर महत्व असते चारित्र्याला ! चात्र्यि, पुर्वपुण्याई, परंपरा, अनुवंशातुन मिळत नाही. ते मिळवावे घडवावे लागते. समाजात विशिष्ठ उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षीत उंची गाठली की आयुष्यातल्या अनेक समस्या ती. उंचीच सोडविते. समाजात जी थोर माणसे असतात, त्यांचे चारित्र्य अनुकरणीय असते, आदर्श असते. त्या पैकीच एक म्हणजे शेतकरी नेते. मा. रघुनाथदादा पाटील. शेतकरी चळवळीतील त्यांच्या निरपेक्ष कार्याचा व कर्तृत्वाचा आज ! अमृत महोत्सवानिमित्त गौरव होतो आहे. ही आपणा सर्वांसाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.



रघुनाथदादांचे शेतकरी चळवळीतील कार्य सन १९८० च्या दशकात सुरू झाले ते आजतागायत गेली ४६ वर्षे अविरतपणे सुरू आहे. या कालावधीत मला सन २००२ ते २०२६ आजअखेर दादांचा सहवास लाभला व लाभत आहे. त्या कार्य सहवासातुनच उमगलेल्या कार्य मग्न व कार्य तत्पर गुरूवर्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न, संत तुकारामाचा एक अभंग आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी ।। जो 'उत्तम व्यवहारे' धन जोडतो आणि खर्च करताना दुख न करता खर्च करतो तो एक सत्प्रवृत्त समजावा या संत वचनाप्रमाणे दादांनी धन मिळविले पण ते 'उत्तम व्यवहारे' मिळावले. पैशामुळे जुजबी आणि अल्पकाळ टिकणारी सत्ता प्रतिष्ठा मिळते पण दादांनी भानगडी करून पैसा मिळविला नाही. शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करूनच त्यांनी पैसा मिळविला. जिद्द, चिकाटी आणि स्वप्नपुर्ती चा ध्यास हे त्रिगुण मानवी जीवनाच्या सफलतेचा पाया आहे. ज्यांच्या जवळ या त्रिगुणाची शिदोरी आहे. त्यांचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, हे सत्य सर्वश्रुत आहे. या सत्याची साक्षात अनुभूती देणारे एक व्यक्तीमत्व म्हणजे रघुनाथदादा. आजच्या समाजकारणात, राजकारणात व सर्व क्षेत्रामध्ये नीतीमुल्यांचा आग्रह धरणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. ज्यांच्याकडे आदराने पहावे अशी माणसे कमी होत चालली आहेत. पण अशा दुर्मिळ माणसातील एक आदराने घ्यावे लागत असलेले नाव म्हणजे रघुनाथदादा पाटील.

मी ज्या ज्या वेळी रघुनाथदादांच्या बरोबर त्यांच्या गाडीतून प्रवास केला. त्या त्या वेळी रघुनाथदादांनी कधीही उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्याचे आठवत नाही. विविध प्रश्न, समस्या, शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, शेतकरी विरोधी कायदे, एम.एस.पी., एम.आर.पी., दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट, निर्यात बंदी, अशा विविध विषयावर गाडीत चर्चा करायचे. बिन कामाच्या विषयांवर त्यांनी गाडीत कधीच चर्चा केली नाही. गाडीतून मराठवाडा, माणदेशातुन जाताना खिडकीतुन बाहेर बघितले आणि शेतकऱ्यांची करपलेली शेती दिसली की रघुनाथदादा, विख्यात इंजिनियर पांडुरंग तोडकर यांच्या जलसंजीवनी या महत्वकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलत असत व हा प्रकल्प झाला तर माणदेशाची, मराठवाड्याची व दक्षिण भारताची शेती आणि शिवार फुलल्या शिवाय राहणार नाही हे आवर्जुन सांगत.

व्यवहार

रेशन ऐवजी रेशनकार्ड धाराकाना त्यांच्या खातेवर थेट रक्कम जमा व्हावी या करिता दादांनी निपाणी ते नागपूर यात्रा काढली, सरकारी शाळेत शिक्षण चांगले मिळत नाही म्हणुन पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात म्हणून थेट पालाकंनाच शिक्षण स्टॅम्प मिळावेत म्हणुन दादांनी सभेतून प्रबोधन केले, रोख रक्कमे ऐवजी डिजीटल व्हावेत ही मागणी उचलून धरली. मिलींद मुरूगकर, अनिल बोकिल अशा विचारवंताना दादांनी सोबत तले. वन्यप्राण्यांना जगण्याचा हक्क मिळाला पण माणसांना मिळाला नाही. म्हणून दादांनी वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करणेची मागणी करून दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या मनातील खदखद शासन दरबारी मांडली, कार्बन क्रेडि पैसे उद्योगपतीं ना मिळतात पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर मुलाप्रमाणे झाडे जपली त्या शेतकऱ्यांनार्बन क्रेडीटचे पैसे मिळाले पाहिजे अशी मागणी लावून धरली, आधुनिक यंत्रानी शेती न करता बैलाद्वारे शेती के तरच पर्यावरण वाचणार आहे. पेट्रोल, डिझेल व कोळसा जाळला तर पर्यावरण नष्ट होणार आहे. हे दादांनी सरकारलासुन सांगितले. शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे बैलांना जपतो त्यामुळे बैलगाडीत शेतकऱ्यांनी व मजुरांन केती वजन भरावे हे शहाणपण सरकारने शिकवू नये अशी सडेतोड प्रतिक्रिया दिली. पोलिस व सैनिक भरतीत पळ मृत्यूमुखी पडतात ते तुम्हाला दिसत नाही आणि बैलगाडी शर्यतीवर बंदी घालता अशा भाषेत दादांनी सरकारला ठिकाणावर आणले आणि बैलगाडीवरील शर्यतबंदी दादांनी उठवली. गाय देव आहे तर तुम्ही का पाळत नाही यावर बोट ठेवून गोवंशहत्या बंदी कायद्यास विरोध केला.

मुल

दोन कापडांची दुकाने, सिमें टच्या कंपन्या, हॉस्टेलस, सिनेमागृहे, दूध संस्था तुम्हाला जवळजवळ चालतात मग दोन साखर कारखाने का चालत नाहीत अशा सडेतोड शब्दात दादांनी सरकारला हालवून सोडले. सरकारने कर्ज मुक्ती करावी म्हणुन दादांनी सन २०१७ साली महाराष्ट्र हादरवून सोडला आणि कर्जमाफी पदरात पाडली. रघुनाथदादांनी

६ऊसाला पहिली उचल रु. ५०००/- रुपये मागितली तर दादा जास्त मागतात असे काही नेते म्हणाले पण गुजरातच्या गणदेवी कारखान्याने तो भाव दिल्यावर सगळे तोंडघशी पडले. सी.पी.एल. रजिस्टर काय असते ते आम्हाला माहित ही नव्हते पण दादांनी या रजिस्टरचा आधार घेवुन शेतकरी विजेचे बिल देणे लागत नाहीं है। तैसा चाले त्यांचे वंदावी पावले" दादांनी शेतीतर सोडाच घरचे बीलही भरले नाही. मी त्यांचे खासदारकीचे शपथपत्र ही है ठासुन सांगितले, "बोले भरले त्यात दादांचे थकीत बिल नमुद केले आहे. हळद, कांदा, द्राक्षे, ज्वारी, तंबाखू, भात, नारळ, ऊस या पिकांना हमीभाव मिळावा म्हणून दादांनी महाराष्ट्र तसेच देश ढवळून काढला. दादांच्या प्रयत्नाने आज शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. पण हा दरही दादांना मान्य नसुन तो अल्प आहे असे दादांचे मत आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा व वारणानदीला सन २०१९ व २०२१ आला त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले हे दादांना पाहावले नाही. या शेतकऱ्यांचे भविष्यात पुन्हा नुकसान होवू ९ व २०२१ साली मोठ्या प्रमाणात महापुर नये आणि पुन्हा महापूर येवू नये म्हणून नदीतील गाळ काढला पाहिजे तसेच पुरप्रवण क्षेत्रात घातलेला भराव काढला पाहिजे रस्त्यात घातलेला भराव काढला पाहिजे, पुलांची उंची वाढवली पाहिजे याकरिता दादांनी नदीच्या उगमापासून ते अलमट्टी धरणापर्यंत माझ्या सोबत प्रवास केला. रंगराजन समिती, स्वामीनाथन समिती, टुटेजा समिती, थोरात समिती, शरद जोशी समिती आदि समितींचा दादांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुर्ण ताकदीने अभ्यास केला.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांची माती झाली असे परखड मत दादांनी मांडले. शेतकऱ्यांना स्वातंत्र मिळाले पाहिजे या करिता दादांनी मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल, मा. पंतप्रधान, महामहिम राष्ट्रपती यांची वेळोवेळी भेट घेतली. शेतकऱ्यांना न्याय व योग्य दर मिळायचा असेल तर राज्य घटनेच्या आर्टीकल ३२३ वी प्रमाणे कृषी न्यायाधिकरण स्थापन करा अशी महत्वपूर्ण मागणी दादांनी केली. दादांनी जाती-धर्माच राजकारण कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल नाही. दादा, बाबु गेणू, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, महात्मा जोतिबा फुले, साहेबराव करपे, शरद जोशी यांचे पुण्यादिन कधीही विसरले नाहीत. तर पदरमोडकरून त्यांनी ते साजरे केले. दादा म्हणतात की, माणुस जन्मावेळी कतृत्वाने शुन्य असतो पण मरताना इतिहास घडवून मरतो म्हणून जयंती साजरी न करत पुण्यादिन साजरा करा असा दादांचा प्रघात होता.

L

रघुनाथदादांनी उभे आयुष्य शेतकरी चळवळीकरिता खर्च केले. शरद जोशी यांचे विचाराने प्ररित होवून शेतकऱ्यासाठी राबले सन २०१२ साली स्वतः स्वर्गीय शरद जोशी यांनी मी उपस्थितीत असलेल्या सभेत सांगितले की, माझे विचारावर कोण चालत असेल तर ते रघुनाथदादा आहेत आणि इथून पुढे सर्वांनी रघुनाथदादा जी दिशा देतील, जे आंदोलन देतील त्याप्रमाणे सर्वांनी रघुनाथदादांच्या बरोबर काम करावे, रघुनाथदादा हेच माझ्या विचारांचे वारसदार आहेत. असे शरद जोशींनी ठामपणे सांगितले.

रघुनाथदादांचे कार्य इतके मोठे आहे की त्यांची दखल महाराष्ट्र बरोबर देशाला घ्यावी लागली. दादांची निती आयोगाच्या सदस्यपदी झालेली निवड, सिफाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हे दादांचे शेतकरी चळवळीतील कर्तुत्व सांगुन जाते. दादांनी कधीही संघटना कोणाच्या दावणीला बांधली नाही. दादांनी कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांत तडजोड वा हातमिळवणी केली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी दादांनी कधीही बळीराजाला धोका दिला नाही. जो किसानोकी बात करेगा वही देश पे राज करेगा या उक्तीप्रमाणे दादांनी प्रसंगी शेतकरी हिताबद्दल बोलणाऱ्या पक्षांना साथ दिली. पण हेच नेते शेतकरी हित विसरले तर दादांही त्यांना नारळ देत असत.

आण्णाभाऊ साठे म्हणत" पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी नसुन ती श्रमीकांच्या तळ हातावर स्थिर आहे. पण त्यात आणखीन पृष्ठी जोडावी लागेल." शेतकऱ्यांच्या वरील अन्यायाचे लढे लढणाऱ्या रघुनाथदादासारख्या भल्या माणसांच्या चांगुलपणावरच ही पृथ्वी आणि शेतकरी तरला आहे, असे त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणावे लागेल. वाचन, चिंतन, मनन व आंदोलन या चतुसुत्रीवर आधारीत दादांच्या कार्याचे अनुसरन करण्याची आम्हा सर्वांना प्रेरणा मिळत आहे. वयाने निवृत्तीची सीमा केव्हाच पार केली आहे. पण मन व शरीर ताजेतवाने ठेवण्याच्या त्यांच्या या वृत्तीला माझा सलाम व शुभेच्छा दादांनी नेहमी तुकारामांच्या अभंगातील चरण सांगायचे बुडती हे जन ।। न देखवे डोळा ।॥ येताो कळवळा म्हणूनिया ।। दादांना नेहमी शेतकऱ्यांचा कळवळा येवो व शंभराव्या वर्षी मोर्चात सामिल होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.

अॅड. माणिक शिंदे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा