*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
बकरीद ईद च्या निमित्ताने गो वंश विक्री आणि गो वंश खरेदी करणा-या दोघांवर मकोका सारखे गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल मुस्लीम समाभजाच्या वतीने करण्यात आली आहे
बकरीद ईद च्या निमित्ताने सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने समाजातील विविध नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे. यावेळी दिनांक 28/05/2026 रोजी असणाऱ्या बकरीद ईद सणांच्या निमित्ताने मुस्लीम समाजाने साजरा करताना कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1995 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बकरीद ईद च्या काळात मोठ्या प्रमाणावर सणांसाठी कुर्बानी करण्याकरिता जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जातात त्यावेळी त्या जनावरांची कोणतेही खरेदी किंवा विक्री करु नये किंवा असे कोण करत असतील तर ते पोलीस प्रशासन यांना तात्काळ कळवावे असे आवाहन सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी समस्त मुस्लीम बांधवाना केले आहे.
यावेळी जमियत उलमा ए हिंद चे तालुका अध्यक्ष मौलाना मोहसीन यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकार कडून बंदी घालण्यात आलेल्या गो वंश हत्या आणि गो वंश वाहतूक प्राण्यांच्यी कुर्बानी न करता ज्या जनावरांची परवानगी कुर्बानी करिता महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे अशाच जनावरांची कुर्बानी करुन महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. व इतर कोणत्याही गोष्टींवर विश्वास किंवा अफवेला बळी न पडता कुर्बानी संदर्भात येणाऱ्या अडचणीबद्धल आमच्या सर्वांशी चर्चा करावी असे आवाहन केले आहे .
अॅड अलिम पठाण यांनी सांगितले गो वंश बद्दल राज्य सरकारने काळजी घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून ते जनावरे बाजारात विक्रीसाठी आणणार नाही फक्त शेतीसाठी उपयोगी असणारे जनावरांची खरेदी विक्री करिता परवानगी द्यावी व मुस्लिम समाजाने राज्य सरकारने केलेल्या कायद्यांचे पालन करून त्यांना या संबंधांची माहिती दिली आहे.
मुफ्ती अबु रेहान यांनी मुस्लीम समाज बांधवांना कुर्बानीचे महत्त्व सांगून ज्या व्यक्तींकडे पैसे आहे अशा प्रत्येक व्यक्तीला कुर्बानी करणे आवश्यक आहे. कुर्बानीसाठी राज्य सरकारने जे नियम केले आहेत तेच जनावरे बाजारातुन खरेदी करावे असे आवाहन केले आहे.
यावेळी सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद यांनी सांगितले की समाज बांधवांनी या काळात गो वंश हत्या आणि गो वाहतूक होऊ नये याकरिता सर्व गाय बैल म्हैस यांचे बाजार दिनांक 26 मे ते 30 मे पर्यंत जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावे व त्याऐवजी बक-यांची कुर्बानी करुन महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करुन प्रशासन आणि समाजाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.तसेच जो कोणी गो वंश विक्री आणि खरेदी करणा-या दोघांवर मकोका सारखे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जो व्यक्ती हत्या किंवा वाहतूक करेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी मुफ्ती अबु रेहान सहाब, मौलाना अन्वर, एडवोकेट आलीम पठान ,मुस्तकीम पठाण, एडवोकेट नईम काझी, सुरज शेख , जहाँगीर बेग , रमजान बेग, समीर शेख, आझाद शेख, इकबाल शेख फिरोज बेग इम्तियाज पठाण, दिशान कबीर,खलील कुरेशी सोहेल पठाण,कलंदर शेख कलीम शेख , जावेद सय्यद , सुपरान शेख, अरबाज बेग , शाहीद बेग , आरीफ पठाण, आलीम शेख, कलीम शेख, अमीर शेख, आयुब शेख, आम्मो मदारी दाऊद मदारी, अक्रम मदारी, व असंख्य मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा