*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
इमेज मंच दिंडनेरली व्यायाम शाळा साहित्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कोईगडे यांच्या प्रयत्नाने लोकनेते बंटी पाटील यांच्या आशीर्वादाने माजी आमदार ऋतुराज दादा पाटील आणि माजी नगरसेवक मधुकर रामाने यांच्या सहकार्याने दिंड नेरली येथील इमेज मंच व्यायामशाळा नवीन साहित्य प्रदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर रामाने नगरसेवक राहुल माने संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक शहाजी देसाई उपस्थित होते
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रामाने म्हणाले कि आजच्या तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहून नियमित व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे तसेच नगरसेवक राहुल माने म्हणाले की युवा पिढी मजबूत असेल तरच आपला देश बलवान होईल
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी संभाजी ब्रिगेडच्या युवा कार्याबद्दल माहिती दिली प्राध्यापक शहाजी देसाई सर म्हणाले युवकांनी महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून आपले जीवन यशस्वी बनवले पाहिजे व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कोईगडे म्हणाले अनेक वर्षापासून व्यायाम शाळा साहित्याची असणारे स्वप्न बंटी पाटील ,ऋतुराज दादा पाटील आणि मधुकर रामाने यांच्यामुळे शक्य झाले तसेच सर्जेराव काळुगडे आबा म्हणाले की दिंडनेरली गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तन मन धनाने प्रयत्न करू
या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच मंगलताई कांबळे माजी सरपंच शांतिनाथ बोटे माजी सरपंच संभाजी बोटे सुनील पाटील माजी सैनिक साताप्पा पोवार राजू चौगुले मा डे सरपंच बाजीराव पाटील संभाजी मगदूम माजी सैनिक प्रवीण पाटील माजी सैनिक दत्तात्रय दीक्षित दत्तात्रय मेटिल शिवाजी मेटिल नाना शिंदे विघ्नेश वाडकर आणि पापा ग्रुप चे सर्व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर उदय भोसले यांनी केले आणि आभार प्रदर्शन युवा व्याख्याते कुणाल कोईगडे यांनी मानले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा