*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
जबरी चोरीतील सोन्याच्या मुद्देमाला सह विटा पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेसह तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जबरी चोरीतील सोने विकण्यासाठी मदत करणारी महिला फरार झाली आहे या आरोपींकडून एकूण ५,७३,४४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे
ह्या गुन्ह्यातील सविस्तर माहिती अशी की
यातील फिर्यादी स्मिता शंकर शेंडगे राहणार गांधी चौक विटा ता. खानापूर जि.सांगली या दि. १५/०५/२०२६ रोजी रात्री १०.३० वा त्यांचे राहते घरासमोर उभ्या असताना एका मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांचे गळयातील २ गंठण चोरून नेल्याची घटना घडलेली होती याबाबत फिर्यादी यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती
मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, राजेंद्र यादव व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील संशयित इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिली होती.
दिनांक २२/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि राजेंद्र यादव यांचे पथक विटा विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकातील अंमलदार पोकों/ प्रमोद साखरपे व पोहेकॉ / हणमंत लोहार यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली कि, रेकॉर्डवरील आरोपी नामे महादेव शंकर पवार रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर हा जबरी चोरीमधील सोन्याचे दागिने विक्री करणेकरीता मोटार सायकलने विटा ते पारे जाणारे रोडवरती असलेले बजरंगनगर येथे येणार असले बाबतची माहिती मिळाली.
नमूद पथकास मिळाले बातमीप्रमाणे एक संशयीत इसम त्याचे काळया रंगाचे पल्सर मोटारसायकलवरून पारे गावाकडुन विटा शहराकडे जाताना दिसला. तसा त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आलेने त्यास पळुन जाणेची संधी न देता त्यास जागीच थांबवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नांव महादेव शंकर पवार वय ३० वर्षे, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर असे सांगीतले. सपोनि राजेंद्र यादव यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगुन दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये त्याचेजवळ १८.२९० ग्रॅम वजनाचे एक मिनीगंठण व ८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या गंठणमधील अर्धवट तुटलेल्या सोन्याच्या तीन साखळ्या असलेले मिळून आले. सदर मंगळसुत्रांबाबत त्याचेकडे चौकशी केली असता महादेव याने सांगीतले की मागील आठवडयामध्ये मी व माझा मित्र विनोद गोविंद पिंपळे रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी रात्रीच्या वेळी विटा शहरातील एका बाईच्या गळयातील गंठण हिसडा मारुन चोरुन नेलेले हे गंठण आहे. तसेच यापूर्वी देखील आम्ही विटा शहरामध्ये मकरसंक्रातीच्या सणाच्या वेळी पायी चालणा-या महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण देखील हिसडा मारुन चोरुन नेलेले आहे. तसेच सदरचे सोन्याचे गंठण हे विनोद पिंपळे याची आत्या मिनाबाई चव्हाण याचे मदतीने विक्री करुन त्यातील आरोपी महादेव पवार यास १,५०,०००/- रुपये दिलेले होते अशी सविस्तर माहीती देवून कबूली दिली.
सदरच्या घटनेबाबत पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासले असता अनुक्रमे (१) विटा पोलीस ठाणे गु.र.नं. २०४/२०२६ बीएनएस कलम ३०४ (२), ३ (५) व गु.र.नं.२७/२०२६ बीएनएस कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे विटा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असलेबाबत पडताळणी झाली. लागलीच सदरचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल ही दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरचे आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आलेले असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्यांचेवर यापूर्वी देखील मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत.
(संजीव झाडे)
पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा