*श्रीपूर--बी.टी.शिवशरण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात महिन्याच्या महिन्याला न देता दोन तीन महिन्यांनी सदर पैसे दिले जातात गेल्या मार्च एप्रिल महिन्याचे तीन हजार रुपये शासनाच्या वतीने पंधरा मे रोजी लाडक्या बहिणींचे खात्यांवर जमा करण्यात आले मात्र माळशिरस तालुक्यातील अनेक गावांतील लाडक्या बहिणींचे पैसेच जमा झाले नाहीत अचानक या बहिणींचे पैसे जमा न झाल्याने बहुतांश महिला वर्गातून नाराजी पसरली आहे दरवेळी शासनाकडून काहींना काही त्रुटी काढून कधी केवायसी करा बँकेत आधारकार्ड द्या कागदपत्रे जोडा अशी मारुतीच्या शेपटी प्रमाणे प्रत्येक वेळी माहिती मागवली जाते या लाडक्या बहिणींनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे तरीही या महिन्यात शासनाकडून या बहिणींचे अचानक पैसे जमा झाले नाहीत यांवर शासनाकडून स्पष्टिकरण वा कोणतीही अधिकृत माहिती सुचना देण्यात आलेली नाही त्यामुळे या अडचणीत सापडलेल्या बहिणींना कोणाकडे दाद मागावी याबाबत त्या संभ्रमात असुन याबाबत
तहसीलदार यांना फोन केला होता मात्र त्यांनी पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग अधिकारी यांना संपर्क साधावा असे सांगितले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा