Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ मे, २०२६

नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नरहरी काळे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू पावशे बिनविरोध निवड

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



       नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नरहरी जगन्नाथ काळे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अर्जुन पावशे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार निबंधक शिवरकर यांनी काम पाहिले.

       नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.      

       नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून आनंद चंद्रकांत काकडे, संतोष शिवाजी मोरे, गणेश सतीश जगदाळे, प्रदीप नानासाहेब जगदाळे, अनिता राजकुमार भोसले, नामदेव तुकाराम सरवदे, शिरीष कुमार गुलाबराव निंबाळकर, अभिजीत बुवासाहेब मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सहाय्यक म्हणून सचिव संजय दत्तात्रेय दुनाखे यांनी काम पाहिले.

फोटो - अध्यक्ष नरहरी जगन्नाथ काळे तर उपाध्यक्ष अभिमन्यू अर्जुन पावशे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा