Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ मे, २०२६

शिवसेना पक्षाच्या मागणीला अखेर यश तुळजापूर शहरातील पार्किंगच्या नावाने होणारी अतिरिक्त वसुली तात्काळ बंद;संबंधितांवर चौकशीची मागणी

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


तुळजापूर : तुळजापूर शहरात श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली अतिरिक्त वसुली अखेर प्रशासनाने बंद केली असून, शिवसेना पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या प्रश्नावर शिवसेना शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत भाविकांची आर्थिक लूट थांबविण्याची मागणी केली होती.


श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या वाहनांसाठी पार्किंग शुल्क म्हणून गुत्तेदाराकडून प्रति गाडी ७० रुपये आकारले जात होते. मात्र शासन नियमांनुसार हे शुल्क ५० रुपये असताना अतिरिक्त २० रुपये आकारले जात असल्याची तक्रार भाविकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत अतिरिक्त वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती.

शिवसेना पक्षाच्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर प्रशासनाने संबंधित गुत्तेदारांना आदेश दिले असून,आजपासून पार्किंगसाठी शासनमान्य ५० रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शिवसेना पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

या संपूर्ण आंदोलनात तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,शहर संघटक नितीन मस्के,शहर प्रमुख बापूसाहेब भोसले यांच्यासह जय अंबिका तरुण मंडळाचे सदस्य विलास कदम,बंटी कदम,अनिकेत बर्वे,समर्थ सांळुखे,विक्रम कदम,आनंद कदम,किरण लोंढे,अमोल लोंढे,प्रशांत मुकेरकर,नाना पेंदे,विशाल कदम तसेच अनेक शिवसैनिक व सभासदांनी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांचे रमेश चिवचिवे यांनी आभार मानले.

दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यांपासून अतिरिक्त २० रुपये कोणाच्या आदेशावरून वसूल करण्यात येत होते, यामध्ये कोणते अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी होते का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच भाविकांकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम संबंधित गुत्तेदाराकडून वसूल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या काळात शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रमेश चिवचिवे यांनी दिला आहे.

आता प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करते का, याकडे भाविकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा