*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
28 फेब्रुवारी 2026 रोजी साडे येथील ईदगाह जमिनीचा वादा विषयक रिविजन अर्ज विभागीय आयुक्तांकडून बंद करण्यात आला, फक्त आठ तारखेत पुणे येथील मा. ॲड. अलिम वजिर पटेल यांच्या प्रयत्नांना यश आले.
वाद असा होता की, नागनाथ रोकडे यांची दोन एकर शेत जमीन जी पूर्वीचे मालक कुलकर्णी यांनी 100-150 वर्षापासून ईदगाह साठी एकूण पोटखराब पैकी फक्त 5 गुंठे जमीन दान दिली होती आणि तशी कल्पना सर्व गावाला देखील होती व आहे तसेच शासन दरबारी 2002-03 पासून नोंद देखील होती. काही वर्षानंतर ही जमीन नागनाथ रोकडे यांनी खरेदी केली ही खरेदी होत असताना पूर्वीचे मालक कुलकर्णी यांनी या इदगाह बाबत सर्वासमक्ष कल्पना दिली होती मात्र फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सदर गृहस्थाकडून 2019 पासून दंडाधिकार्यांच्या फेऱ्या चालू होत्या.
शेवटी मा. ॲड. अलिम वजिर पटेल यांच्या प्रयत्नातून मा विभागीय आयुक्तांकडून या वादाला पूर्ण विराम मिळाले. तीन चार महिन्यांत हा निकाल सर्वासमोर येईल असे ॲड. अलिम वजिर पटेल यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा