Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० मे, २०२६

हवामान बदल ! एल निनो ! लोक सहभाग व कृषि विभाग योजना

  सेवा रत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे मंडळ अधिकारी अकलूज (ISO9001:2015 )



एल निनो  हवामान बदल मधील एक प्रकार आहे ही प्राकृतिक नैसर्गिक अपत्तीहवामान बदल चा परिणाम जून पासून सुरू होऊन ९ ते १२ महिनी राहते . या मध्ये पेरू देशाचे जवळ पॅसिफिक महासागर मध्ये सलग ३ महिने 0.5 डिग्री सेल्शिअस पेक्षा जास्त तपमान राहीले की या महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ढग आकर्षित होतात व पाऊस कमी , विखुरलेल्या , तुरळक , लाँग ड्राय स्पेल , सरासरी पेक्षा कमी पडतो यामुळे जलाशय धरणे बंधारे पूर्ण क्षमतेने करले जात नाहीत सन २०२६ -२०२७ मध्ये एल निनो उदासिन राहणार आहे यांचा अंदाज सर्व केंद्र व राज्य शासकिय हवामान संस्था कृषि विद्यापीठ व संशोधन संस्था व अशासकीय संस्था यांनी अंदाज व्यक्त केला आहे! देशातील महाराष्ट्रातील 50% पेक्षा शेती पाऊस व पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे . एल निनो मुळे जून ते सष्टेबर कालावधीत ९०% पर्यंत पाऊस कमी पडतो.          



 . यामुळे शेतीच्या , वापराच्या पिण्याच्या व औद्योगिक पाणी कमतरता येते . यामुळे पाण्याची पातळी खाली जाते जमिन कोरडी पडते किटकांचा उदा पांढरी माशी मावा तुडतुडे प्रार्द्र भाव वाढते व उत्पादन व उत्पन्न मध्ये लक्षणीय घट येते .याहवामान बदल घटकावर मात करण्यासाठी प्राथमिक विचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे काळाची गरज आहे .यासाठी शासकीय नि मशासकीय गाव पातळीवर सार्वजनिक वैयक्तिक उपायोजना करणे कर्मप्राप्त आहेत . *। ) वैयक्तिक उपाय* *योजना -* १ -जमिनीची खोल नांगरट उताराला आडवी करणे व मशागतही आडवी करणे २ -खरीप पिकाची समतल पेरणी करणे . ३ -मान्सूनपूर्व शेतामध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करणे मृत सरी काढणे . ४ -कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली कमी कालावधीचे अवर्षण प्रवण ला तग धरून राहणारे पीक व त्याचे वाण निवड करणेव पेरणी करणे . ४ -पिकाचा कालावधी व मुळाची संरचना यानुसार आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे . ५ -एकरी  हेक्‍टरी रोपांची संख्या शिफारशीनुसार ठेवणेव आपत्कालीन परिस्थितीत ती संख्या कमी करणे . ६ -पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब संवर्धन करण्यासाठी जमिनीत सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रीय खत कंपोस्ट खत वापर करणे ७ -पाणी उपलब्धता व पडणारा पाऊस या आधारे येत्या खरीप आणि रब्बी मध्ये कमी कालावधीच्या पिकाची निवड व लागवड करणे . *II ) शासकिय योजना अंतर्गत उपाय* *योजना - १* )आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत प्रोत्साहन मिळावे म्हणून खालील प्रमाणे शासकीय योजनांचा वापर करून एल निओ हवामान बदल वर उपाय न करू शकतात १- .राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र राज्य एकात्मिक उत्पादन विकास योजना अंतर्गत शेततळे खोदाई साठी ७५ हजार व प्लॅस्टिक अस्तरीकरण ७५ रु अनुदान उपलब्ध आहे करून संरक्षित पाण्याची सोय करता येते . २ - प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना मोअर क्रॉप पर ड्रॉप चा लाभ घेऊन पाणी खत औषध वेळ इंधन ऊर्जा बचत करण्यासाठी ७० ते ८०% पर्यंत पीक परत्वे अनुदान उपलब्ध आहे . ३ - एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत मल्चिंग पेपर व्हीड मॅट वापर करून पाणी बचत सर्वधन करू शकता यासाठी १० ते २लाख अनुदान उपलब्ध आहे . ४- पडणाऱ्या पाऊसाचा प्रत्येक थेंब जमिनित संवर्धन करणेसाठी महात्मा गांधी ग्रामीन रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर पूर्नभरण बोअर पूर्नभरण जलशोषक खडडा जलतारा बाबी प्रति ५हजार अनुदान लेबर व सामुग्री स्वरूपात उपलब्ध आहे . ६ - दुष्काळ सदृष्य अपतकालीन परिस्थितीत CRA टेक्कनिकचा वापर पाळबागासाठी करणे ७ - सबसरफेश टिंबक सिंचनाचा वापर करणे . ८ - MIDH अंतर्गत पाकाची कव्हर , स्करटिंग बॅग , प्रोटेक्शन पेपर चा वापर करून पाणी संवर्धन करणे९-राज्य कृषी यांत्रीकरण व सब मिशन योजना संरक्षण मुलद्रव्ये स्ट्रेस कालावधीत फवारणीसाठी ड्रोन चा लाभ . Ill ) *सार्वजनिक* *उपाय योजना १* - हवामान अंदाज नियमित अपडेट साठी महाकृषि AI अप वापरकर्ते बना . २ - वॉटर कप पाणी फाऊडेशन गट शेती ,समुह शेती , गट शेती , शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेती गट सह ईराजिक औजार बँक सामूहिक बियाणे खते निविष्ठा एकत्रिती खरेदी करून उत्पादन खर्च बचत करा . ३ - जून ते जुलै कालावधीत रासयनिक खचाता वापर /अतिरिक्त वापर टाळावा ४- निकृष्ठ बियाणे खते किटकनाशके वापर टाळावा . ५ - उष्ण वारे लाट लहरी व वारे संरक्षणासाठी वारा प्रतिबंध शेवरी गिनीग्रास सुबाधुळ चारा पीके वापर करा . ६ - ऊस केळी जून पाने काढून सरीत अस्तरीकरण करा ! ७ - सध्या लागवड ऊस केळी भाजीपाला फळपिके उष्णता उष्ण वारे कोरडी हवा वाढलेले तपमान व सहनशिलता वाढविणेसाठी २ % पोटॅशियम सिलेकेट किंवा सिलिकॉन किंवा नॅनो डिएपीची फवारणा करा . ८- अपत्कालीन परिस्थिती मध्ये खुप पाणी तान पावसाचा तान पाणी कमतरता साठी पिकावर 2 % कॅवोलिनच्या द्रावनाचे ड्रोनद्वारे फवारणी करावी . अशापद्धतीन सार्वजनिक उपाययोजना वैयक्तिक उपाययोजना व शासकिय योजनांचा लाभ घेऊन एल निनो हवामान परिस्थिती बदल घटकावर प्रतिबंधात्मक उपचारात्मक सार्वत्रिक उपाययोजना काळाची गरज आहे! आपली तयारी हीच आपली सुरक्षितता !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा