Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० मे, २०२६

अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार.*

 *अकलूज-- प्रतिनिधी* 

 *केदार.  लोहकरे*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मल्लिकार्जुन मंदिरात शनी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्याच बरोबर वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी व बारावीत परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला होता. यामध्ये सतरा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


        सकाळी शनी महाराज यांच्या मुर्तींची अभिषेक व महापूजा रविशंकर गुळवे यांच्या हस्ते संपन्न झाली व समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार समाजाच्या वतीने शाल,श्रीफळ,एक वृक्ष व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये बारावी इयत्तेतील पाच विद्यार्थी व दहावी इयत्तेतील बारा विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत.या कार्यक्रमाच्या शेवटी समाजाच्या वतीने समाज बांधवांसाठी महाप्रसादाची (भोजनाची) उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा