*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
L कांदा दर प्रति किलो १० रुपये च्या आत पर्यत घसरले आहेत हे आपन ऐकत आहे वाचत आहे. कांदा प्रामुख्याने खरीप ' रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो . यावर्षी समाधानकारक पाऊस हवामान थंडी मुळे विक्रमी कांदा उत्पादन झाले आहे प्रति एकर उत्पादन समाधानकारक आहे कांदा उत्पादन 'बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर कांदा पिकाचे दर अवलंबून व स्थिर होतात . कांदा हवेशीर ' शास्त्रीय तांत्रीक ' पद्धतीने साठवन केली तरच तो टिकतो . सध्य परिस्थितीत शेतकरी बांधवांकडे तांत्रिक आधूनिक शास्त्रीय कांदा साठवन सुविधा उपलब्ध नसलेमुळे नुकसानाला सामोरे जावे लागते आहे. कांदा दराचा प्रश्न पांढरा कादा पीकाला जास्त परिणाम करत नाही कारण पांढरा कांदा ८०% प्रक्रियासाठी वापरला जातो . लाल कांदा च्या दरातील चढ व उतार सर्वसामान्य व शेतकरी बंधू यांचे अंदाजपत्रक वर परिणाम करणारा घटक आहे. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय कृषि विकास योजना मधून महाडीबीटीवर शेतकरी बंधू व शेतकरी समुह यांनी समाजस्य करार सह कांदा चाळ उभारणीलाअर्ज करावा . १० टन साठी १ एकर १५ टन साठी दीड ते दोन एकर व २५ टनासाठी १ हे कांदा लागवड व नोंदीचा ७ / १ २ ' ८ अ ' आधार कार्ड बॅक पासबुक झेरॉक्स व उभा रणी करावयाचे कांदा चाळ क्षमताचे नुसार प्लॅन व सविस्तर अंदाजपत्रक अपलोड केलेस पूर्वसंमती नंतर ३ महिने कालावधीत विहीत आकारमानाची कांदाचाळ उभारणी केलेस प्रति टन ४०००रु अनुदान शेतकर्यांना अदा केले जाते . दर उतार घसरण वेळी कांदा प्रतवारी करून शास्त्रीय पद्धतीने साठवन करून दर वाढ झालेवर विक्री केलेस नक्कीच शेतकरी बांधवाना फायदा होईल . तरी कांदा उत्पादकांनी कांदा चाळ उभारणी साठी आधिक माहीती व मार्गदर्शनासाठी नजीचे कृषि विभाग कार्यालय व कर्मचारी यांचेशी संपर्क करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलूज कार्यालयाने केली आहे .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा