Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जून, २०२६

*मुदत संपूनही औद्योगिक कर वसुली करण्याकरिता जप्ती का करत नाहीत भाजपचे सावंत शिवाजी रामकृष्ण माजी सैनिक यांचा पक्ष व प्रशासनास प्रश्न पुढे आंदोलनाच्या पवित्र्यात*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व इतर सर्व नावाजलेल्या कंपन्यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्या सुनावणीनंतर कर वसुलीची नोटीस बजावली होती ज्याची मुदत २७ मे २०२६ रोजी संपली आहे, 


  मागील अंदाजे तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तच कालावधीपासून जप्ती करून वसुलीची थकीत रक्कम मिळण्याबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी चालढकल करत असून ग्रामपंचायत अधिनियम १९५९/१९६० चे कलम १२४, १२९ व ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ प्रकरण ८ प्रमाणे वसुलीसाठी जप्ती कारवाई प्रशासन  का करत नाही याकरिता भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी (माजी सैनिक) ज्यांच्या पत्नीने पंचायत समिती तामलवाडी गणामधून नुकतीच निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती व दिनांक १८ मे २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्याचे भाजपचे नेते, मित्राचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह यांना काटगाव जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती (दादा) माळी, दादासाहेब घोडके, सतीश माळी, महेश माळी यांच्यासह भेटून प्रशासन वसुलीची कारवाई करत नसल्याबाबत माहिती दिली होती


 त्यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर, यांना फोनद्वारे स्पष्ट जप्ती करून वसुली करण्याबाबत सूचना देऊनही तत्पूर्वी भाजपचे तुळजापूर तालुकाध्यक्ष व सभापती पंचायत समिती तुळजापूर, भाजप तालुका सरचिटणीस तथा काटगाव पंचायत समिती सदस्य ज्यांच्या वाहिनी आहेत असे श्री बालाजी शिंदे यांच्या सूचना असतानाही कार्यवाही सुरू न झाल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांना एका लेखी निवेदनाद्वारे स्मरणपत्र देऊन त्वरित कारवाई करावी अशी विनंती केली आहे व या कर वसुलीच्या कामाकरीता श्री सावंत यांना ०९ वेळा यापूर्वी आंदोलने करावी लागली आहेत, तसेच ३५ ते ४० वेळा सतत लेखी स्वरूपात पाठपुरावा केलेला आहे . याबाबत कारवाई नाही झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांनी लेखी निवेदनात कळवले आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी तामलवाडी येथील पंचक्रशीत औद्योगिक वसाहतीमधील जप्ती करून वसुली कारवाई सत्ताधारी पक्ष करतोय का नाही, कार्यकर्त्याच्या पाठीमागे सत्ताधारी पक्ष उभा राहतो का नाही, की श्री सावंत आपल्या गावाकरिता आणखीन काही स्वतंत्र निर्णय घेतील याबाबत तामलवाडी परिसरात चर्चा रंगली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा