*अकलूज- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पंचवटी अकलूज येथील कु.गायत्री रत्नकांत क्षीरसागर(वय२१) हिने महाविद्यालय शिक्षण संपत असतानाच तिची मुंबई शहर पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.गायत्री हिने आई-वडीलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
घरची परिस्थिती गरीबीची असून वडील रत्नकांत त्रिंबक क्षीरसागर एका हाॅटेलमध्ये काम करीत आहेत व आई सौ.उमा रत्नकांत क्षीरसागर या शेतात मजूरीचे म्हणून काम करून संसाराचा गाडा चालवित आहेत. त्यांनी काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण देवून स्व:ताच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.आज कु.गायत्री हिने आई वडीलांच्या कष्टाचे चीज केले आहे.घरी चार मुली,एक मुलगा असा परिवार आहे.एका मुलीचा विवाह झाला असून एक मुलगी डिएमएलटी शिक्षण घेत आहेत तर आवळी जावळी एक मुलगी व एक मुलगा दहावीचे शिक्षण घेत आहेत.
कु गायत्री हिला समरजीत करिअर अकॅडमीचे आप्पासाहेब तोरणे सर यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी मैदानी खेळाचे पोलीस प्रशिक्षणाचे धडे दिले आहेत तर मनोज गरगडे सर यांनी लेखी सराव करून घेतला.गायत्री हिचे लहानपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न होते ते आज पुर्ण झाले आहे.पुढे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आहे.गायत्री हिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचवटी येथे झाले असून पाचवी ते बारावीचे शिक्षण दि मॉडेल विविधांगी प्रशालेत झाले असून अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात आर्ट्स विभागातून शिक्षण झाले आहे.महाविद्यालयात प्रथम वर्षात असताना पोलीस प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आज तृतीय वर्षात तीची पोलीस पदासाठी निवड झाली आहे.
*चौकट*
मुलांना आमच्या सारखे मजूरीचे काम करण्याची वेळ त्यांच्यावर येवू नये म्हणून त्यांना चांगले शिक्षण देवून उच्चशिक्षित शिक्षण देवून मुलांनी स्वतःच्या पायावर उभा रहावीत ऐवढीच अपेक्षा आहे.
*रत्नाकर त्रिंबक क्षीरसागर*
(वडील)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा