*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा पोलीस ठाणे पोलिसांनी दमदार कामगिरी केले असून
--टर्मीन इंजेक्शनच्या एकुण १५० बाटल्या जप्त------ Troikaa कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे २० बॉक्समधील १५० बाटल्या रक्कम रूपये ४९,१३३/-रू. व १,६०,०००/-रू किमंतीची बुलेट मोटारसायकल असा एकुण २,०९,१३३/-रू. किंमतीचा मुददेमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
दि. २९/०५/२०२६ रोजी १२/५० वा.सु. दोन इसम हे करमाळा शहरातील कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ Troikaa कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे एकूण २० बॉक्समधील एकुण १०० बाटल्या प्रति बॉटल ३३४.४०/-रू प्रमाणे एकुण ३३,४४०/-रू. व TERMIVA कंपनीच्या MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या नावाचे एकूण ५० बाटल्या प्रति बॉटल ३१३.८७/-रू प्रमाणे एकुण १५,६९३/-रू. असा एकुण ४९,१३३/-रू किंमतीचे हे "परिशिष्ठ एच" प्रवर्गात मोडत असल्याने ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिट्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, व त्याचे खरेदी बिल नसताना अवैद्य मार्गाने प्राप्त करुन अशा औषधाचे वापरामुळे स्वास्थास / जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे तसेच त्यातील विषारी द्राव्याचे दुष्परीणाम होवून इंजेक्शन घेणारे व्यक्तींचे जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर दुखापत होवू शकते हे माहीत असताना नमुद इंजेक्शन अवैधरीत्या प्राप्त करुन गैरवापर करण्याच्या उददेशाने अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता १,६०,०००/-रू किंमतीची बुलेट मोटारसायकल वरून घेवुन जाताना मिळून आला म्हणुन वगैरे मजकुरचा करमाळा पोलीस ठाणे गुरनं. ४८८/२०२६ भा.न्या.सं. कलम २७८, १२५, १२३, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे
सदर गुन्हयाची मा. श्री. रणजित माने सोा, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांना व पोकॉ/८५६ गोसावी, पोकॉ/१६७ दहिहांडे, पोकॉ/१५२४ रंदिल व पोकॉ/११४२ शेरखाने असे पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी कर्जत रोडवरील पाण्याची टाकी जवळ, करमाळा येथे रवाना करून सदर पथक हे साध्या वेशात जावून सदर घटनेच्या अनुषंगाने त्या इसमांवर पाळत ठेवून सदर पथकांनी प्रतिबंधित इजेंक्शन विक्री करीत असलेल्या दोन इमसांना जागीच मुददेमालासह पकडुन त्यांचेकडे सदर मिळालेल्या प्रतिबंधित इर्जेक्शनबाबत चौकशी करून त्यास सदरचे इंजेक्शन कोणाकडुन विकत घेतले आहे याबाबत चौकशी केली असता सदर पथकास एका इसमाकडुन विकत घेतली असल्याची माहिती मिळाल्याने सदरबाबत मा. रणजित माने सो। यांनी सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून सदर इसमांविरूध्द करमाळा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला असुन सदर इसमांना पोलीसांनी अटक केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील मिळुन आलेले MEPHENTERMINE INJECTION IP या इंजेक्शनच्या औषधाचा उपयोग हा Low blood pressure या आजारात केला जातो. तसेच त्याचा दुरूपयोग हा to achieve better physical performance यासाठी ही होतो. सदर औषधाच्या वापराचा दुष्परीणाम हा drowsiness, incoherence, hallucinations, convulsions, slow heart rate असे तसेच किडनीचे तसेच हृदयाचे आजार उध्दभवू शकतात. सदरचे इंजेक्शन हे "परिशीष्ठ एच" मधील औषध असुन सदरचे
औषध हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी पण सदर असे लोक बेकायदेशिरपणे अशा प्रकारचे औषधे विक्री करतात.
सदरची कामगिरी ही श्री. अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. विजय कबाडे साो, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, अंजना कृष्णा व्ही.एस. साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रणजित माने, सो।, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे, पुरुषोत्तम धापटे, पोलीस उपनिरीक्षक, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१६७ मिलींद दहिहांडे, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल व पोकॉ/११४२ स्वप्निल शेरखाने यांनी केली आहे.
आवाहन-
करमाळा शहरातील तसेच ग्रामीण भागातील तरूणांना तसेच जीममध्ये व्यायाम करणा-या तरूणांना करमाळा पोलीस ठाणेकडुन आवाहन करण्यात येते की, तुम्ही ताप्तुरती चांगली शरीरयष्टी बनविण्यासाठी अशा प्रकारचे नशाचे इंजेक्शनचा वापर करण्याऐवजी तुम्ही नैसगित समतोल आहार आणि योग्य व्यायाम करून शरीर यष्टी कमविली पाहिजे. तीच शरीर यष्टी आयुष्यभर टिकेल. सदरील इंजेक्शनाने तात्पुरता फायदा मिळेल, पंरतु तुमच्या शरीरातील हृदय, किडनी अशा अनेक शारीरिक अवयवांवर कायमचा विकार होवुन एखादा गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे. तसेच सदर इंजेक्शनचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी जास्त प्रमाण झाल्यास त्यामध्ये मृत्यु होवु शकतो. तसेच आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करीत आहोत की, अशा प्रकारच्या नशेचे इंजेक्शन हे कोणी विकत असल्यास तात्काळ आम्हांस कळवावे. आपली नावे गोपनिय ठेवण्यात येतील.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा