*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
रासायनिक खतासाठी जिल्ह्यातील कोणी विक्रेत्यांनी लिंकिंग केले तर त्यांची गय केली जाणार नाही
खत उत्पादक कंपन्यांनी सुद्धा कोणत्याही विक्रेत्यांना लिंकिंग करू नये असा सज्जड दम आज जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी दिला
जिल्हाधिकारी कार्यालयात रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते यांची तातडीची तातडीची बैठक घेण्यात आली
यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी हरी हावळे यांनी जिल्ह्यात खते व बियाणे यांचा मुबलक साठा असून त्याची आकडेवारी बैठकीत सादर केली
जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सर्व जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा बैठकीत मांडला
यावेळी विक्रेत्यांच्या वतीने शितल भाई तांबोळी
महेश चिवटे मापदाचे उपाध्यक्ष श्री बालाजी चौगुले यांनी विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या
कुर्डूवाडी येथील रस्त्याच्या कामामुळे कुर्डूवाडी रेल्वे एक पॉईंटला गेली दोन महिन्यापासून खते येत नसल्यामुळे जिल्ह्यात खतपुरवठा कमी प्रमाणात झाला ही गोष्ट काही विक्री त्यांनी निदर्शनास आणून दिली
येथील रस्त्याच्या वादामुळे कुर्डूवाडी येथील जवळपास 500 हमाल व त्यावर जगणारी ट्रक ड्रायव्हर व ट्रक गाड्यांचे मालक यांचे वर उपासमारीची वेळ आली आहे
यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकी एन तात्काळ मुख्याधिकारी कुर्डूवाडी यांना फोन लावून रस्ता खुला करून देण्याचे सूचना दिले
यावेळी न्यानो युरिया चा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जर केला तर युरियाची मागणी कमी होऊन युरियावर होणारे प्रचंड कोट्यावधी रुपयाची सबसिडी वाचून परकीय चलन वाचेल
युरियाच्या बेसुमार वापरामुळे होणारे कॅन्सर सारखे आजार थांबतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत जिल्हा विक्री त्यांच्या वतीने महेश चिवटे यांनी मांडले
त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी नॅनो युरिया वापरण्यासाठी जनजागृती करून शेतकऱ्यांना सुद्धा नॅनो युरिया वापरण्याचे आवाहन केले
यावेळी जिल्ह्यात कोठे बनावट खते व बियाणे विक्री केली जात असतील तर त्याची माहिती कृषी खात्याला द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाऊन अशा डुबलीकेट कृषी निविष्ठा विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा कृषी विकास अधिकारी हरी हावळे यांनी दिला
तूर मुग उडीद मका सोयाबीन अशा कमी दिवसांच्या पिकाला फवारणी द्वारे नॅनो युरिया दिला तर
अपेक्षेपेक्षा जास्त चांगला फायदा पिकांना होते
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 3700 बाटली नॅनो युरिया शेतकऱ्यांना मोफत करण्यात येणार असलेल्या या उपक्रमाचे माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी यांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे
उपतालुकाप्रमुख बाळासाहेब वाघ यांनी सादर केले या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा