Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जून, २०२६

आनंद दरबार मध्ये भक्तांबर स्तोत्राचे सामूहिक पठणातून विश्वशांतीचा संदेश.

 पुणे, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



अधिक महिन्याचे औचित्य साधत जेष्ठ पौर्णिमा उत्सवानिमित्त पुणे दत्तनगर आनंद दरबार मध्ये रविवार दिनांक ३१ मे रोजी भक्तांबर पठणाचे सामूहिक पठण संपन्न झाले. यावेळी जोडप्यांसह अनेक श्रावक श्राविका यांनी सामूहिक भक्तांबर पठण करून विश्वशांतीचा संदेश दिला.  


जैन धर्माचे प्रखर वक्ता प. पू. हिमानीजी म. सा., प.पू. हिमांशीजी म. सा. Gतसेच प.पू. रविकाश्री म. सा. यांचे आध्यात्मिक मार्गदर्शना खाली संपन्न झाला. यावेळी प. पू. हिमांशीजी म. सा. म्हणाल्या, जैन आचार्य मानतुंगाचार्य यांनी जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांची स्तुती करण्या साठी या स्तोत्राची संस्कृत भाषेत निर्मिती केली असून त्यामध्ये ४८ गाथा आहेत. प्रत्येकजन दररोज या स्त्रोत्रांचे पठण करून भक्ती करत असतात. त्यामुळे मनशांती मिळून आत्मविश्वास वाढतो. पंचमकाळात भक्त ते भगवान असा आध्यात्मिक प्रवास करण्यासाठी हे स्तोत्र राजमार्ग आहे.

यावेळी आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, आपले मन नियंत्रित करण्यासाठी तसेच आपल्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी या स्त्रोत्रांचे रोज पठण करणे ही काळाची गरज आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी गौतम प्रसादी ( धोंडे जेवण ) देण्याचा पुण्यलाभ   उत्सव कौषभ धोका व सौ. स्मिता विलास कोटेचा यांना मिळाला. 

या कार्यक्रमाचे प्रभावना भाग्यशाली होण्याचा मान सौ. राजकुंवर देवेंद्रकुमार धोका, मनोज मुकेश छाजेड व विआन सूरज पारख यांना मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप संचेती, विलास कोटेचा, प्रमोद रांका,  सुजाता सुराणा, अर्चना गादिया, दीपाली चूत्तर यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा