*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला पाणी देण्याच्या निर्णया विरोधात अहिल्यानगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मांगी गावालगत दिनांक 22 जून 2026 सोमवारी सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मांगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुजित तात्या बागल यांनी बोलताना दिली
याबाबत अधिक माहिती देताना बागल पुढे म्हणाले की महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयानुसार मांगी त्याला प्रकल्पामधून जामखेड तालुक्यातील आडगाव येथील कृषी महाविद्यालयाला पाणी देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधी आम्ही करमाळा तालुक्याच्या वतीने तसेच मांगी परिसरातील एकूण 22 गावांच्या वतीने आम्ही सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे श्री बागल यांनी बोलताना सांगितले याबाबत अधिक माहिती देताना बागल आणखीन पुढे म्हणाले की मांगी तलाव प्रकल्प हा आमचा व आमच्या 22 गावातील अस्मितेचा प्रश्न असून या प्रकल्पातील पाणी इतर तालुक्याला आम्ही देणार नाही यासाठी रक्तपात झाले तरी चालेल मांगी प्रकल्पाच्या तलावामधून मांगी सहित आसपास परिसरातील एकूण 22 गावे या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसिंचनाच्या माध्यमातून ओलिताखाली येत असून या तलावातील पाणी आम्ही देणार नाही असा ठाम आत्मविश्वास श्री बागल यांनी यावेळी बोलून दाखविला
मांगी तलावातील पाणी इतर तालुक्याला देण्यासंबंधी आमचा कडाडून विरोध असून यासाठी सोमवारी मांगी गावासहित 22 गावातील ग्रामस्थांचा तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री बागल यांनी शेवटी बोलताना सांगितले सदर रास्ता रोको आंदोलनामध्ये मांगी सहित इतर बावीस गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सदर पाणी देण्याचा डाव वेळीच आणून पाडावा असे आवाहन श्री बागल यांनी शेवटी बोलताना केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा