Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जून, २०२६

अकलूज: प्रभाग क्र. ५ मधील जैन मंदिर परिसरात 'हाय मास्ट' दिव्याची मागणी; भाजप सरचिटणीस अमोल माने यांचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


 अकलूज   येथील नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जयसिंगराव खुळे यांना भारतीय जनता पार्टी अकलूज शहराचे सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने यांच्या वतीने एक परिपत्रक व निवेदन सादर करण्यात आले. अकलूज शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये असलेल्या प्रसिद्ध जैन मंदिर परिसरात भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने 'हाय मास्ट' (उंच दिवा) बसवण्यात यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



​प्रभाग क्रमांक ५ मधील जैन मंदिर हे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र श्रद्धास्थान आहे. या जैन मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक उत्सव, प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी केवळ प्रभागातीलच नव्हे, तर संपूर्ण अकलूज परिसरातून मोठ्या संख्येने जैन बांधव, महिला, वृद्ध आणि बालके उपस्थित असतात. अनेकदा हे धार्मिक कार्यक्रम पहाटे तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.

जैन मंदिर परिसरात वर्षभर धार्मिक चैतन्य असते. भाविकांची, विशेषतः महिला व वृद्धांची गैरसोय टाळण्यासाठी आणि संपूर्ण परिसराच्या सुरक्षेसाठी येथे हाय मास्ट दिवा बसवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची मागणी आहे."

— अमोल बाळासाहेब माने (सरचिटणीस, भाजप अकलूज शहर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा