*तुळजापूर-- प्रतिनिधी*
*मकबुल तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्यावतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उंडरगाव तालुका लोहारा येथील मागासवर्गीय मुलींच्या अपहरण प्रकरणातील फरार आरोपी वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात पडले आहे की उंडरगाव ता. लोहारा येथील दिलीप वाघमारे यांच्या अल्पवयीन दलित मुलीस पूस लावून राहत्या घरी येऊन उंडरगाव येथील गावगुंड हनुमान दगडू माने व आशा दगडू माने यांनी जबरदस्तीने घरातून मुलीला मोटरसायकलवर बसून घेऊन गेले आणि तोरंबा टाकी तालुका लोहारा येथील संतोष राम गायकवाड यांच्या हवाली करून त्यांना फरार केले आहे. सदर प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी तक्रार देऊन तब्बल एक महिना ओलांडले आहे तरी त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सदर प्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा,अपहरण कायदा बरोबरच पोस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यात वाढ करून सदर फरार आरोपी यास तात्काळ अटक करून मागासवर्गीय मुलीची सुटका करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या वेळी रिपाइं धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.विद्यानंद बनसोडे जिल्हा सरचिटणीस मा.सिद्धार्थ ओव्हाळ जिल्हा कार्याध्यक्ष मा.बाबासाहेब मस्के ,जिल्हा सचिव मा.एस के गायकवाड, मा.भालचंद्र कटारे तालुका अध्यक्ष धाराशिव मा.बाबासाहेब बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे रिपाइं नळदुर्ग सर्कल प्रमुक यांच्यासह मुलीचे आई-वडील व पदाधिकारी उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा