*संग्रामनगर -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
संग्रामनगर, दि. २८ जून २०२६ : संग्रामनगर ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणी आज नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने नागरिकांनी श्रमदान करून कचरा संकलन व स्वच्छता केली.
या मोहिमेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यापुढे प्रत्येक रविवारी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत दोन तास संग्रामनगर परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेत संग्रामनगरमधील सर्व नागरिक, युवक, व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
“स्वच्छ संग्रामनगर, सुंदर संग्रामनगर” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी प्रत्येक रविवारी श्रमदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
चायत हद्दीतील साई मंदिर परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणी आज नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने नागरिकांनी श्रमदान करून कचरा संकलन व स्वच्छता केली.
या मोहिमेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यापुढे प्रत्येक रविवारी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत दोन तास संग्रामनगर परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेत संग्रामनगरमधील सर्व नागरिक, युवक, व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
“स्वच्छ संग्रामनगर, सुंदर संग्रामनगर” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी प्रत्येक रविवारी श्रमदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा