Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० जून, २०२६

ओबीसी जनगणना झालीच पाहिजे : कल्याणराव आखाडे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



ओबीसी जनगणना झालीच पाहिजे असा ठराव वाशिम येथे संपन्न झालेल्या ओबीसी जनगणना परिषदेत करण्यात आला. महाराष्ट्र सावता परिषद आयोजित वाशिम येथे संपन्न झालेली ओबीसी जनगणना परिषद ही लढ्याला दिशादर्शक व बळ देणारी ठरली असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक कल्याणराव आखाडे यांनी दिली.   परिषदेचे संयोजक तथा सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे व वाशिमच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी या परिषदेचे अतिशय उत्तम व नेटके नियोजन केले होते. संपूर्ण शहरात झळकणारे बॅनर होर्डिंग्ज आणि उपस्थितांची लक्षणीय संख्या यामुळे ही परिषद लक्षवेधी ठरल्याचे सूतोवाच श्री. आखाडे यांनी केले



या परिषदेतील मंजूर ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

यावेळी सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस

संतोष राजगुरू म्हणाले, ओबीसी जनगणना झाली पाहिजे ही अनेक वर्षापूर्वीपासून ओबीसी समूहाची न्यायिक व रास्त मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रसंगी तिव्र आंदोलने छेडण्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला. सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे म्हणाले,

एस.सी. व एस.टी. प्रवर्गाप्रमाणे ओबीसी प्रवर्गाच्या संख्येचीही नोंद होणे केंद्र सरकार च्या आश्वासनानुसार यावेळी अपेक्षित होते. मात्र जनगणनेच्या माहिती तक्त्यामध्ये ओबीसींसाठी रकाना ठेवला नसल्याचे निदर्शनात येत आहे. या विरोधात सावता परिषद बंडाच्या पावित्र्यात असून तमाम ओबीसी बांधवांनी यासाठी एकजुटीने समोर येण्याचे आवाहन याप्रसंगी परिषदे वतीने करण्यात आले.









यावेळी मंचावर ओबीसी नेते तथा माजी आमदार हरिदास  भदे व माजी आमदार बळीराम सिरस्कर यांच्यासह सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे, प्रदेश उपाध्यक्ष शाम मेहेत्रे, आकाश वाघमारे, गोरखनाथ राऊत, सावता प्रदेश प्रवक्ते ॲड गोपाळ बुरबुरे, प्रदेश संघटक विठ्ठल गाभणे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख ज्ञानेश्वर भोपळे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ गूल्हाने, वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे, उपनगराध्यक्ष राजू भांदुर्गे, जेष्ठ नेते संतोष हुसे,अशोक अंभोरे, जयंत म्हैसने, अनिल बळी, संतोष नागरे,राम राऊत, शिवदास सूर्या पाटील, शाम तायडे, शाम टेटवार, आशिष ढोमने, विठ्ठल ढगे, नगरसेवक सौ.जयश्री वानखेडे, गजानन लांडगे, सावता परिषद नांदेड जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, शैलेश इंगळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

परिषद यशस्वीतेसाठी प्रदेश उपाध्यक्ष रवी भांदुर्गे, प्रदेश महासचिव प्रविण वाघमारे, वाशिम जिल्हाध्यक्ष विलास ढगे, अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निखाडे, कार्याध्यक्ष अनंता बगाडे, महानगर जिल्हाध्यक्ष दिनेश सोळंकी, अमरावती जिल्हाध्यक्ष ऍड. श्रीकांत नागरीकर, कार्याध्यक्ष शेखर माळोदे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष दिपक बोरकर व दत्ता जवळकर, वाशिम महिला जिल्हाध्यक्षा सौ. रंजना पारिस्कर, अकोला जिल्हाध्यक्षा सौ.मिरा म्हैसने, वाशिम युवा जिल्हाध्यक्ष शेखर जटाळे, अकोला युवा जिल्हाध्यक्ष गोपाळ काकड, अमोल कलोरे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष रवी वानखेडे, चेतन इंगोले, अजय ढोणे, रामेश्वर राऊत, संकेत म्हैसने, चेतन शिंदे, गजानन ठेंगडे, प्रसाद नाळे, बाबू माल, अमोल गाभने, संतोष व्यास, दिपालीताई काळे, रेखाताई जहिरव, रश्मी काळे, वंदना वानखेडे, रवी राऊत, सोनू बळी, गणेश उबाळे, उमेश राऊत, ओम पोफळे, गजानन वानखेडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा