Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० जून, २०२६

*अकलूजमध्ये "बागवान सहारा फाउंडेशन"चा द्वितीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ जोडप्यांचा विवाह थाटामाटात संपन्न - फाउंडेशनच्या वतीने वधूवरांना प्रत्येकी २५ हजारांचे रुखवत भेट...!* *राजकीय,सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह सोलापूरच्या "शाहीन फाउंडेशन"ची प्रमुख उपस्थिती...!*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज येथील बागवान समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या "बागवान सहारा फाउंडेशन"च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दुसऱ्या भव्य सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला.आनंद नगर (अकलुज) येथील आनंदी गणेश मंदिराच्या भव्य हॉलमध्ये ७ जून २०२६ रोजी गोरज मुहूर्तावर हा सोहळा पार पडला.यावर्षी एकूण १४ वधू-वरांनी हजारो लोकांच्या साक्षीने आपल्या नवीन जीवनाची  सुरुवात केली...



सामाजिक बांधिलकीचा आदर्श प्रवास..

बागवान समाजातील युवकांनी दोन वर्षांपूर्वी सामाजिक जाणिवेतून "बागवान सहारा फाउंडेशन"ची स्थापना केली होती.संस्थेने पहिल्याच वर्षी ५ वधू-वरांचे विवाह यशस्वीपणे लावून देऊन सर्वच समाज घटकांचे लक्ष वेधून घेतले होते.यंदाच्या दुसऱ्या वर्षी ही संख्या १४ वर पोहोचली असून,संस्थेने अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करत या सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते 

        हल्ली महागाईच्या काळात वधूवरांच्या माता पिताना आपल्या मुला मुलीचे लग्न करणे हे जिकरीचे ठरत असून आपणही समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने बागवान समाजातील युवकांनी मागील दोन वर्षापासून सामुदायिक विवाहचा उपक्रम चालू केल्याने गोरगरीब माता पिताना यांचा आधार मिळत आहे याबाबत अनेकांनी बागवान सहारा फाउंडेशनचे आभारही व्यक्त केले



*दिग्गजांची मांदियाळी आणि मुंबई सह शेजारील कर्नाटक राज्यातून पाहुण्यांची हजेरी...*

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद दिले.यामध्ये विधान परिषदेचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील,नगराध्यक्ष सौ. रेश्माताई अडगळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.विशेष म्हणजे,या विवाह सोहळ्याचे कौतुक करण्यासाठी मुंबई पासून ते थेट शेजारच्या कर्नाटक राज्यापर्यंतचे पै  पाहुणे आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यस्त असल्या कारणाने माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी यांनी "बागवान सहारा फाउंडेशन"च्या युवकांना भ्रमण ध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या तर सौ शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः हजर राहत वधू आणि वरांना शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद दिले...

*"निकाह को आसान करो"चा संदेश घेऊन "शाहीन फाउंडेशन"ची उपस्थिती...*

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमध्येही  विवाह सोहळ्यांचे यशस्वी आयोजन करणारे आणि "निकाह को आसान करो" हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या सोलापूरच्या प्रसिद्ध "शाहीन फाउंडेशन"चे अध्यक्ष हाजी उमरभाई बागवान (M राऊंड) यांनी आपल्या संपूर्ण टीमसह या सोहळ्याला हजेरी लावली व अकलूजच्या बागवान सहारा फाउंडेशनच्या तरुणांच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले...

*प्रत्येक जोडप्याला २५ हजारांचे रुखवत...*

महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने,"बागवान सहारा फाउंडेशन"च्या वतीने विवाह बंधनात अडकलेल्या प्रत्येक "दुल्हा-दुल्हन"ला जवळजवळ २५ हजार रुपये किमतीचे रुखवत (संसारोपयोगी साहित्य) भेट म्हणून देण्यात आले.संस्थेच्या या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे...

नियोजन आणि परिश्रम...

या सोहळ्यातील सर्व वधू-वरांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि विवाह रजिस्टर नोंदींची महत्त्वाची जबाबदारी हाजी शुकुर रसूल बागवान आणि म गौस शब्बीर बागवान यांनी चोखपणे पार पाडली...

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी "बागवान सहारा फाउंडेशन"चे अध्यक्ष तोहीद (मुन्ना) चौधरी,उपाध्यक्ष हाजी नाजीरहुसेन मोहोळकर,जावेद बागवान,सचिव तनवीर तांबोळी,खजिनदार नाझीम खान,दिलदार मोहोळकर,आलिम बागवान,अखिल बागवान,रफिक तांबोळी,जुबेर बागवान,साहिल बागवान यांच्यासह "अकलूज शहर बागवान जमाती"च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा