Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जून, २०२६

अकलूज: अकलाई स्मशानभूमीतील अंत्यविधी कट्ट्यांवरील पत्रे तात्काळ बदला; भाजप अकलूज शहराची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



अकलूज नगरपरिषद हद्दीतील अकलाई स्मशानभूमी येथील अंत्यविधीच्या कट्ट्यांवर असलेले छताचे पत्रे अत्यंत खराब झाले असून, नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे पत्रे तात्काळ नवीन बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टी अकलूज शहर च्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. 



​दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलाई स्मशानभूमी हे अकलूज शहरातील एक मुख्य अंतिम संस्काराचे ठिकाण आहे. मात्र, सध्या येथील अंत्यविधीच्या कट्ट्यावरील छताचे पत्रे मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत, काही ठिकाणी ते तुटले देखील आहेत आगामी पावसाळा तोंडावर आला असताना, जर हे पत्रे तातडीने बदलले नाहीत तर पावसाच्या दिवसांत अंत्यविधीच्या वेळी मृतांच्या नातेवाईकांना आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला



सामोरे जावे लागेल.

​स्मशानभूमीतील ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता, येथील अंत्यविधी कट्ट्यावरील तात्काळ नवीन पत्रे बसवून द्यावेत. जर या मागणीवर त्वरित सकारात्मक कारवाई झाली नाही तर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​यावेळी भारतीय जनता पार्टी अकलूज शहर  सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने  भारतीय जनता पार्टी अकलूज शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष जतिन वायदंडे, भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ते शशिकांत ननवरे  संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे निवेदन भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा