Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० जून, २०२६

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळ येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९


पर्यावरण संतुलन ही काळाची गरज आहे मात्र वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केले तर

भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन वृक्ष संजिवनी परिवाराच्या अध्यक्षा सौ. सायरा भाभी आत्तार यांनी केले.


वृक्ष संजिवनी परिवार व इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध झाडांचे वृक्षारोपण जगद्गुरु संत तुकाराम

महाराज पालखी स्थळ येथे करण्यात आले. यामध्ये चिंच, बकुळ,

 भेंडी, वड, पिंपळ, गुलमोहर, टर्मेलिया आदी प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी जय नर्सिंग इस्टिट्यूटच्या सर्वेसर्वा

सौ. लता नायकुडे, महिला पोलीस

कॉन्स्टेबल माधुरीताई लडकत, वृक्ष संजिवनी परिवारच्या रश्मीतार्ई निलाखे, स्वाती अधटराव, इंदापूर नगर पालिका उद्यान प्रमुख अशोक चिंचकर, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप, नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष 

सुभाष थोरात,ॲड आनंद केकान, जगद्गुरु संत तुकाराम

महाराज पालखी सोहळा उत्सव

 समितीचे खुशाल महाराज कोकाटे,

पतंजली योग समितीचे

देवराव मते, वृक्ष संजिवनी परिवाराचे चंद्रकांत देवकर,

हमीदभाई आतार, श्रीनाथ सेवा संस्थेचे प्रमुख हनुमंत बोंगाणे,

भारत बोराटे, गजानन पवार, सूरज गानबोटे व नागरिक मोठ्या

संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन वर्षापासून वृक्ष संजिवनी परिवार शहर हरित व सुंदर करण्यासाठी

वृक्षारोपणाचा उपक्रम शहरात सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून राबवत असल्याचे परिवाराच्या अध्यक्षा सायराभाभी आत्तार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा