*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
- वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने जोमदार हजेरी लावली. परंतू वाऱ्याच्या वेगामुळे आंबा, केळी, डाळींबासह ऊस, कडवळ आदि पिके भुईसपाट झाल्याने प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर गणेशवाडी येथे कुबाभळ पत्र्याचे घर, माल वाहतूक पिकअप व चारचाकी गाडीवर पडून नुकसान झाले पण जिवीत हानी टळली. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आभाळात ढग दाटून आले. त्याबरोबरच अचानक महाविनाशकारी वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शेतात उभी असणारी केळी, आंबा, नारळ, डाळींब फळपिकासह ऊस, कडवळ, मका आदि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान इतके महाभयंकर झाले की बघताच शेतकरी, सर्वसामान्यांना रडू कोसळले आहे.
गणेशवाडी येथील केळीचे नुकसान झालेले शेतकरी आबासाहेब तावरे, वसंत तावरे यांची सात एकर, सिताराम तावरे यांची तीन एकर, गणेश शंकर घोगरे, शंकर संदिपान घोगरे यांची आठ एकर, अण्णा अंकुश शिंदे यांची तीन एकर, दिगंबर केरबा शिंदे यांची तीन एकर, अशोक केरबा शिंदे यांची पाच एकर, हरिदास मारुती घोगरे, वृंदावन हरिदास घोगरे, मयुर घोगरे, जयदिप घोगरे यांची बारा एकर, हरिदास शाहूराव घोगरे यांची तीन एकर, सतीश दगडू घोगरे यांची तीन एकर, सौदागर दगडू घोगरे यांची दोन एकर, सुधाकर हनुमंत घोगरे यांची दोन एकर, राजेंद्र रामचंद्र तावरे यांची तीन एकर, नवनाथ भागवत तावरे यांची दोन एकर, सिद्धेश्वर उत्तम तावरे, तुकाराम उत्तम तावरे यांची पाच एकर, ज्ञानेश्वर मच्छिंद्र घोगरे यांची दोन एकर, राजेंद्र जयसिंग घोगरे यांची पाच एकर, रेश्मा अभिमन्यू घोगरे यांची तीन एकर, बाबासाहेब दत्तात्रय घोगरे यांची तीन एकर, बाळासाहेब ज्ञानदेव तावरे यांची दोन एकर, विजयसिंह दत्तात्रय घोगरे यांची तीन एकर, उल्हास केशव तावरे यांची चार एकर, कृष्णा उत्तम घोगरे यांची चार एकर केळी भुईसपाट होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नारायण शहाजी घोगरे यांची डाळिंबही उन्मळून पडली आहेत.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणातील निरगीलीची झाडेही उन्मळून पडली आहेत. तर सुनील बलभिम कांबळे यांच्या पत्र्याच्या शेडवर कुबाभळ उन्मळून पडल्याने पत्र्याची एक रूमसह दोन गाड्यावर पडल्याने नुकसान झाले आहे. शिंदेवस्ती येथे रस्त्यालगतची वडाची झाडे रस्त्यावर पडल्याने बावडा नरसिंहपूर मार्गावरील वाहतूक धिमी झाली होती. वाऱ्याचा प्रचंड वेगामुळे शिनगरवस्ती ते शिंदेवस्ती पर्यंत विजेच्या तारांचे खांब व तारा तुटून पडले आहेत. तर राहुल बागल यांच्या घराजवळील लोखंडी खांब वाकला आहे.
गणेशवाडी, शिंदेवस्ती, पिंपरी बुद्रुक, गिरवी, टणू, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, सराटीसह परीसरातील गावात केळीचे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने पिकांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
फोटो - गणेशवाडी येथील केळीचे तसेच घर, वाहने तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
---------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा