Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ जून, २०२६

*लोकायत लोकसंचलित साधन केंद्र, अकलूजची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*

 मुख्यसंपादक

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-9730867448



महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय सोलापूर मार्गदर्शित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष, माळशिरसच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत लोकायत लोकसंचलित साधन केंद्र, अकलूज यांची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ जून २०२६ रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, पंचवटी (अकलूज) येथे संस्थेच्या सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाली


या कार्यक्रमासाठी अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा  रेश्मा आडगळे, माविम पुणे विभागाचे विभागीय सल्लागार  विलास बच्चे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार  सिद्धाराम माशाळे, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी  मन्सूर पटेल, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी  दीपक टेकाळे, नगरसेविका . प्रतिभा गायकवाड,  वैशाली भोसले,  मंदाकिनी पाडोळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक  महेश गव्हाणे, HDFC बँकेचे शाखा व्यवस्थापक . सुधाकर पवार, लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा  -संगीता गडदे, सचिव -भारती लोंढे, व्यवस्थापक - कामिनी ताटे-देशमुख, लेखापाल - आरती काशिद, क्षेत्र समन्वयक - सपना पोरे व - नीता शिंदे, ग्रामसंघ लेखापाल  गणेश वाघमारे, सर्व CRP तसेच अकलूज शहरातील बचत गटांतील सुमारे १,८०० महिला सदस्य उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या स्वागताने झाली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित महिलांनी "इतनी शक्ती हमें देना दाता" हे प्रेरणागीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचे वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक . कामिनी ताटे-देशमुख यांनी केली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संस्थेचा वार्षिक अहवाल . आरती काशिद यांनी सादर केला. या वर्षात १०० टक्के महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांना विविध बँकांमार्फत वित्तपुरवठा करण्यात आला असून १०० टक्के कर्ज परतफेड करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सन २०२५-२६ मध्ये बचत गटांना ₹७,४७,५५,४०० इतके कर्ज वितरित करण्यात आले. ग्रामसंघांची ₹७७ लाखांची उलाढाल झाली. तसेच PMFME अंतर्गत ₹४,०९,५०० व OSF अंतर्गत ₹१,०५,००० इतका निधी उपलब्ध करून महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात आले. कापड, चप्पल, भाजीपाला, किराणा, चिकन सेंटर, स्टेशनरी, खानावळ, शिवणकाम आदी विविध व्यवसायांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारल्याची माहिती देण्यात आली.

एलडीसी . उमेश जाधव यांनी CMRC अंतर्गत ED उपक्रमांची माहिती दिली, तर  तुषार लुंकड यांनी CMEGP योजनेविषयी मार्गदर्शन केले.

. मन्सूर पटेल यांनी PMFME, CMEGP, PMEGP तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ५० टक्के अनुदानासह विविध शासकीय योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांनी उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सिद्धाराम माशाळे यांनी उद्योग उभारणी, व्यवसाय बळकटीकरण, कच्चा माल व बाजारपेठ उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले. म

विलास बच्चे यांनी महिला सक्षमीकरण, बचत गटांची भूमिका आणि आर्थिक स्वावलंबन यावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. सौ. रेश्मा आडगळे यांनी बचत गट हे केवळ आर्थिक मदतीचे माध्यम नसून महिलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणारी प्रभावी चळवळ असल्याचे सांगितले. तसेच लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यानिमित्त उत्कृष्ट बचत गट, ग्रामसंघ, उद्योजिका, MLP, कर्मचारी, लेखापाल, CRP तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पदाधिकाऱ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्व CRP यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

सभेमध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. CRP  रुपाली गांधी यांनी "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या विषयावरील प्रभावी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या शेवटी CMRC अध्यक्षा यांनी उपस्थित मान्यवर, सभासद व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात लोकायत लोकसंचलित साधन केंद्र, अकलूजची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा