*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
कुंभेज फाटा - रामवाडी रोड वरती उमरड येथे गती रोधक बनवावा कोठावळे शॉपिंग सेंटरच्या कॉर्नर वरती गतिरोधक तयार करावा या ठिकाणी धोकादाय कॉर्नरर असून चौक आहे एक रस्ता पूर्व सोगाव कडे जातो व दुसऱ्या बाजूला उमरड गावात जातो या ठिकाणी आठवडी बाजार भरतो व रोड लगतच जिल्हा परिषद शाळा आहे त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात या आठ दिवसांमध्ये चार दिवसाच्या फरकाने समाधान काळे व प्रजोतबदे यांचे पाय मोडले आहेत सध्या या दोन्ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत .
चौधरी वलटे वस्ती वरती गतिरोधक तयार करणे अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणी बोगदा असून कॉर्नर आहे जवळच जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे या ठिकाणी दोघा जणांचा काही दिवसांपूर्वीच अपघातामध्ये मृत्यू झाला आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो म्हणून ततकाळ ळ गतिरोधक टाकण्यात यावा . या ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतः टाकलेला गतिरोधक ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय परस्पर काढण्यात आला यामुळे ग्रामस्थ मध्ये संतापाची लाट आहे.
आठ दिवसाच्या आत या दोन्ही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावा गतिरोधक नाही टाकल्यास बहुजन संघर्ष सेना ग्रामस्थांना घेऊन राजाभाऊ काफम यांच्या नेतृत्वा खाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या करमाळा कार्यालया समोर करेल याची नोंद घ्यावी हे निवेदन बांधकाम अभियंता पाटील साहेब जगताप साहेब यांनी स्वीकारले
निवेदन देण्यासाठी उपस्थित ग्रामस्थ दत्तात्रय दासा बदे, संतोष रामदास कोकरे, अशोक अनंता वलटे, कल्याण वलटे, हर्षद धर्मराज वलटे, दीपक बापू वलटे, हनुमंत पांडुरंग लठ्ठे, सोमनाथ श्रीहरी लठ्ठे, शहाजी दिगंबर वलटे, सतीश चतुर्भुज वलटे, भीमराव सदाशिव वलटे, ब्रह्मदेव महादेव वलटे, सचिन रामचंद्रबदे, मयूर भीमराव वलटे, किरण चांगदेव वलटे
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा