Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ जून, २०२६

कालठण पुनर्वसन कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण क्रमांक एक गावच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कालठण क्रमांक एक (

ता. इंदापूर ) येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषी मंत्री श्री. भरणे बोलत होते.

मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, कालठण पुनर्वसन कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून यामध्ये महिला अस्मिता भवन व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय यांचा समावेश आहे. उजनी धरणासाठी त्याग केलेल्या स्थानिक भुमी पुत्रांनी संघर्षमय जीवनातून कालठणचे नंदनवन केले आहे, याचा अभिमान आहे



आजच्या काळात महिलांनी आर्थिक स्वावलंबन करून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे महिला सक्षमीकरण करण्यासाठी या गावात महिला अस्मिता भवन बांधले जाईल. जीवन

जगताना आनंदी जीवनाचा मुलमंत्र जोपासणे गरजेचे आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने राहावे असा मौलिक संदेश मंत्री भरणे यांनी दिला.

  स्थानिक प्रश्नाचे दिलेल्या निवेदनावर सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील अशी ग्वाही मंत्री श्री. भरणे यांनी दिली. कालठण पुनर्वसन उभारणीत कै. दतात्रय जाधव, भिमराव पाडुळे, गुलाबराव पाटील, तुकाराम शिंदे व सहकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे मंत्री भरणे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, दिलीप भिसे,  हर्षदा जाधव, अमोल 

भिसे, संदेश देवकर, निलेश देवकर, अशोक शिंदे, तानाजी नरूटे, अंकुश पाडुळे, आपा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन 

१९५७ साली कबड्डी संघाचे क्रीडापटू दत्तात्रय जाधव, वामन

जाधव, वडजीनाथ माने, गौतम गटकुळ, अर्जुन गटकुळ, हरीदास चिंचकर, विठ्ठल सपकळ, साहेबराव शिंदे,

साहेबराव जगताप या कबड्डी संघाचे नेतृत्व केलेल्या क्रीडापट्टूंचा तसेच दिवंगत क्रीडापट्टू यांच्या कुटुंब  सदस्यांचा सत्कार मंत्री दत्तात्रय भरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

 सुवर्णमहोत्सवी वर्ष यशोगाथा आठवणी भगवान कोळेकर, सचीन जाधव, अण्णासाहेब धोत्रे, महेश जाधव आदींनी सांगितल्या. 

कार्यक्रम समन्वयक म्हणून सतीश शिंदे व सचीन जाधव यांनी काम पाहिले.

कार्यक्रम यशस्वीते साठी लालासाहेब जगताप, किसनराव जावळे, भास्कर पाडुळे संजय माने, बाळासाहेब मदने, नितीन जावळे, अण्णासाहेब कोळेकर, विजय जेडगे, गणेश गाटशिळे, श्रीकांत पवार, हनुमंत पांडुळे, नितीन दीक्षित व ग्रामस्थानी प्रयत्न केले. 

प्रस्तावना प्रा. सतीश शिंदे यांनी तर

सुत्रसंचलन भास्कर जगताप व अविनाश शिंदे यांनी केले.

आभार समीर पाडुळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा