*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
बावडा परिसरातील गावांमधील शेतीला पूर्ववत आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा. शेती फिडरवरील सायंकाळचे ४ तासांचे भारनियम रद्द करावे, आदि मागण्यांसाठी जिजामाता चौक, बावडा (ता. इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर सोमवारी (दि. १) महिला, शेतकरी आणि नागरिकांनी दिड तास 'रास्ता रोको' आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सदर आंदोलन प्रसंगी पंडितराव पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, महादेव घाडगे, विजय गायकवाड, अॅड. अनिल पाटील, धैर्यशील पाटील, पवनराजे घोगरे, सुधीर कोकाटे, उमेश पाटील, मनोज जगदाळे, रणजित गिरमे, बाळासाहेब भोसले, गणेश घोगरे यांनी शेतकरी व नागरिकांच्या अडचणी भाषणामध्ये मांडल्या.
यावेळी महावितरण इंदापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे यांनी शुक्रवार (दि. ५) पासून शेतीला पूर्ववत ८ तास वीजपुरवठा व शेती फिडरवरील सिंगल फेजिंगचे सायंकाळचे ६ ते १० वेळेतील भारनियमन रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके, शाखा अभियंता व्ही. एस. घोलप, शेतकरी धैर्यशील पाटील, राहुल बागल, उमेश शिंदे आदिंसह महिला, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - बावडा येथील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा