Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जुलै, २०२६

*अकलूज उपजिल्हा रुग्णालय "रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी "साजिद भाई सय्यद यांची निवड*

 *अकलूज प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयावर"रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी" साजिद भाई सय्यद "व लक्ष्मीकांत दगडू वाघ यांची तर माळशिरस ग्रामीण रुग्णालयावर ‌ मारुती देशमुख तर नातेपुते ग्रामीण रुग्णालयावर संदीप चंद्रकांत ठोंबरे यांची रुग्ण कल्याण समिती सदस्य पदीनिवड केल्याचे  माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी पत्रकाद्वारे दिली ऊ

माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालय, माळशिरस ग्रामीण रुग्णालय व नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथील रुग्ण कल्याण समितीवर सदस्य नियुक्तीस मान्यता देणेबाबत.जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय सोलापूर यांना पत्र दिले आहे 


 माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अकलूज उपजिल्हा रुग्णालय, माळशिरस ग्रामीण रुग्णालय व नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथील रुग्ण कल्याण समितीच्या कार्यात प्रभावी लोकसहभाग वाढावा, तसेच रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उ‌द्देशाने खालील व्यक्तींची रुग्ण कल्याण समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. तरी खालील नियुक्त्यांना आपल्या स्तरावर मान्यता देऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी,असेही  पत्रकात म्हटले आहे 

रुग्णालयाचे नाव व रुग्ण समिती सदस्य १)अकलूज उपजिल्हा रुग्णालय -लक्ष्मीकांत दगडू वाघे,२) अकलूज उपजिल्हा रुग्णालय --साजिद इब्राहिम सय्यद ३) माळशिरस ग्रामीण रुग्णालय--मारुती देशमुख ४) नातेपुते ग्रामीण रुग्णालय--संदीप चंद्रकांत ठोंबरे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा