Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

*संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा "बलराज "अश्व विधिवत पूजा करून रवाना*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज

सालाबाद प्रमाणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज अश्व सोमवारी सकाळी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आला.

   गेली सुमारे ४० वर्षांपासून संत तुकाराम महाराज देवस्थान देहू यांच्या आग्रहास्तव स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी या सोहळ्यासाठी अश्व देण्याची प्रथा सुरू केली.त्यांचे पश्चातही त्यांचे पुत्र डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे.

  सालाबाद प्रमाणे सोमवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या बलराज या अश्र्वाला सजवून त्याची श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील व डॉ.धवलसिंह व उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.यावेळी भजनी मंडळीचे भजन सुरू होते.पुजनानंतर अश्र्वाला वाजत गाजत निरोप देण्यात आला.यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर, मााणिक मिसाळ,अण्णासाहेब शिंदे,तुकाराम बिराजदार,सुधिर लांडे,भिमराव बाळगे,दीपक पिंजारी,सत्यवान मगर, जयसिंग मोरे,राजू निकाळजे, सागर देशमुख,आदी उपस्थित होते.

   यावेळी बोलताना डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की,गेली ४० वर्षांपूर्वी स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी ही प्रथा सुरू केली असून ती आम्ही पुढे चालवत आहे.बलराज हा जातीवंत अश्व असून त्याचे वय साडेसात वर्षे आहे.त्याने आत्तापर्यंत ४ वेळा हा पालखी सोहळा केला आहे.त्याला ६ महिन्यापासून आम्ही चांगल्या सवयी लावतो,त्यामुळे त्याने सोहळ्यात कधी कुणाला लाथ मारल्याची तक्रार आलेली नाही,यासोबत जात असलेल्या स्वारा सोबत आम्ही या अश्र्वासाठी लागणारा खुराक व इतर साहित्य देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा