Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० जुलै, २०२६

करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीज, मिळणार सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांचा आमदार नारायण आबा पाटील यांना फोन*

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेती पंपासाठी आता आठ तास वीज मिळणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की कालच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर वीज कपातीमुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागत आहे याबाबत माहिती दिली होती. यावेळी लेखी निवेदन सुध्दा देऊन वीज कपात केल्याने होणारे आर्थिक नुकसान तसेच विद्यार्थी व लघु उद्योजक यांना होणारा त्रास याबद्दल समस्या मांडली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच सकारात्मक होऊन तातडीचे आदेश महावितरण व जिल्हाधिकारी यांना दिले. आता आठ तास वीजेबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी आपणास भ्रमणध्वनी वरुन ही माहिती दिली असल्याने आता लवकरच शेती पंपासाठी आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर आमदार नारायण आबा पाटील यांनी सर्वच स्तरावर वीज कपाती विरोधात प्रयत्न केले. आमदार म्हणुन त्यांनी विधानसभा सभागृहात तसेच राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरही हा प्रश्न मांडला. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोर्चातही ते शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरले. यामुळे आता विरोधकांची तोंडे यामुळे बंद झाली आहेत. ज्यांना करमाळा तालुक्यातील वीज प्रश्नावरुन केवळ राजकारण करुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका करुन तोंड सुख घ्यायचे होते ही मंडळी आता पुर्णपणे तोंडावर पडली असल्याचा टोला पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा