*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील सुफी संत हजरत वली चांद पाशा दर्गा मध्ये उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी जश्ने मिलादुन्नबी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती दर्गाह ट्रस्टने दिली
याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टच्या पदाधिकारी सांगितले की प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आवाटी येथील वली बाबा दर्गा मध्ये जशने मिलादुन्नबी कार्यक्रमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मुए मुबारक दर्शनचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे याच वेळी सकाळी दहा वाजता फातिहा खानीचा कार्यक्रम होणार आहे याशिवाय लंगर खाना महाप्रसाद यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गावर विविध रंगाची घोषणा करण्यात आली आहे
तरी सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन वली बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी तसेच खादीम गुलाम-नबी कादरी तसेच इरफान कादरी याशिवाय सुफी हसनैन कादरी व आवाटी ग्रामस्थ यांनी केले आहे
_____________________🌹🌹🌹🌹____________







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा