*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज नगरपरिषदेच्या कंत्राटी महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचे मागील एक महिन्याचे थकीत पगार आणि काही कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफ (भविष्य निर्वाह निधी) पूर्व ठेकेदाराकडून तात्काळ मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन उप मुख्याधिकारी जयसिंगराव खुळे यांनी स्वीकारले.
सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत पगार व पीएफ येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
मुख्य मागण्या आणि कर्मचाऱ्यांची व्यथा नगरपरिषदेत अहोरात्र राबून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना मागील एक महिन्यापासून पगार मिळालेला नाही. तसेच, काही कर्मचाऱ्यांचा हक्काचा पीए फदेखील पूर्व ठेकेदाराकडे प्रलंबित आहे. ऐन महागाईच्या काळात पगार रखडल्याने या गरीब कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने यामध्ये मध्यस्थी करून पूर्व ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ मिळवून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
प्रशासनाने यावर ८ दिवसांत तोडगा काढला नाही, तर सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी संघटना आंदोलन करले असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. हे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले
निवेदन देताना वेळी उपस्थित 'सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाबासाहेब माने, शशिकांत ननवरे, जतीन वायदंडे, शहाबाद काझी, रमेश करूडकर आदींसह संघटनेचे कार्यकर्ते व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकलूज सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचा प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम!
पर्याय कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी अकलूज नगरपरिषदेला निवेदन; या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ' संघटनेचा आंदोलनाचा इशारा.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा