*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
..
'माझे वडील तलवार घेऊन आई आणि मला मारण्यासाठी धावत आहेत... लवकर या' डायल ११२ वर आलेल्या या आर्त कॉलने शिक्रापूर पोलिसांची यंत्रणा क्षणार्धात सतर्क झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हातात तलवार आणि खिशात धारदार चाकू घेऊन पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेत संभाव्य रक्तरंजित घटना रोखली
ही बाब पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गांभीर्याने घेतली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सुनील यशवंत शेंडगे हे ६ जुलैच्या रात्री डायल ११२ कर्तव्यावर होते. मंगळवारी सकाळी १०.१६ वाजण्याच्या सुमारास साहिल खराबे याचा मदतीचा कॉल प्राप्त झाला. कॉलमध्ये वडील तलवार घेऊन आई आणि मुलाच्या जीवावर उठल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शेंडगे यांनी वरिष्ठांना कळवून पोलीस कॉन्स्टेबल साळवे यांच्यासह तातडीने धानोरे (ता.शिरूर) येथे धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले असता बाबासाहेब नामदेव खराबे (वय ४३) हा पत्नी व मुलाला शिवीगाळ, दमदाटी करत हातातील तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावत होता. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. झडतीदरम्यान त्याच्या पँटच्या खिशातून धारदार चाकूही जप्त करण्यात आला. आरोपीकडून सुमारे ३० इंच लांबीची तलवार आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील शेंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव अधिकारी शिवाजी भोसले हनुमंत गिरी पोलीस अंमलदार सुनील शेंडगे नितीन साळवे उद्धव भालेराव प्रशांत गायकवाड बापू हदगले रोहिदास पारखे मयूर कुंभार यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा